एकीकडे 'धुरंधरचं' सक्सेस, दुसरीकडे वास्तुशांती! अक्षय खन्नाच्या आलिशान घराचे Inside Photo

Last Updated:

Akshaye Khanna Home : एकीकडे 'धुरंधर' सिनेमातील अक्षय खन्नाच्या भूमिकेचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक होत असताना दुसरीकडे अक्षय खन्ना मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण साजरे करतोय.

News18
News18
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने त्याच्या करिअरची दुसरी इनिंग सुरू केली आहे. छावा सिनेमात औरंगजेबची भूमिकेत त्याने सगळ्याचं लक्ष वेधलं. त्यानंतर आता 'धुरंधर'मध्ये रहमान डिकैत बनून अक्षय खन्नाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'धुरंधर' सिनेमातील त्याची एन्ट्री आणि डान्सने सगळ्यांना त्याच्या तालावर नाचवलं आहे. धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या कामाचं सध्या सर्वत्र कौतुक होतं. धुरंधर सिनेमानं 400 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
एकीकडे 'धुरंधर' सिनेमातील अक्षय खन्नाच्या भूमिकेचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक होत असताना दुसरीकडे अक्षय खन्ना मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण साजरे करतोय. सगळे धुरंधरचं सक्सेस सेलिब्रेट करत असताना अक्षय खन्ना त्याच्या घरी वास्तुशांती करतोय. अक्षय खन्नाच्या घराच्या वास्तुशांतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
advertisement
अक्षय खन्नाकडे मुंबईत एक-दोन नव्हे तर तब्बल तीन घरं आहेत.  याशिवाय अलिबागमध्ये त्याचं एक आलिशान फॉर्महाऊसही आहे. कामाच्या धावपळीतून वेळ मिळाला की अक्षय खन्ना बहुतेक वेळा शनिवारी-रविवारी अलिबागच्या घरी जातो आणि तिथे शांत वेळ घालवतो. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं त्याला आवडतं.
advertisement
अक्षय खन्नाच्या घरी वास्तुशांती करणाऱ्या गुरुजींनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षय खन्नाच्या घराची पहिली झलक पाहायला मिळते. मात्र हे घर नेमकं मुंबईतील आहे की अलिबागमधील याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही घराचं आलिशान रूप पाहून चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
advertisement
घराबाहेर मोठी मोकळी जागा असून आजूबाजूला हिरवळ आणि झाडं आहेत. घराच्या आत मोठा हॉल असून भिंतींना सफेद रंग देण्यात आला आहे.  साध्या पण एलिगंट रंगसंगतीमुळे घर आणखी प्रशस्त आणि आकर्षक दिसत आहे. घरात काही सुंदर पेंटिंग्सही लावण्यात आल्या आहेत. इंटीरियरला खास टच पाहायला मिळतोय. 
advertisement
एकीकडे 'धुरंधर'च्या यशाचा आनंद तर दुसरीकडे घराची वास्तुशांती करणाऱ्या अक्षय खन्नाला पाहून चाहते अवाक् झालेत. मिळत असलेल्या प्रसिद्धीचा त्याला काहीच मोठेपणा वाटत नाहीये. त्याच्यासाठी त्याचं काम किती महत्त्वाचं आहे हे त्याने पुन्हा दाखवून दिलं आहे.  अक्षय खन्ना त्याच्या प्रोफेशनल यशासोबतच वैयक्तिक आयुष्यातही खूप सुखी आणि समाधानी असल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
एकीकडे 'धुरंधरचं' सक्सेस, दुसरीकडे वास्तुशांती! अक्षय खन्नाच्या आलिशान घराचे Inside Photo
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement