Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी वाढदिवशी स्वत:लाच दिलं महागडं गिफ्ट, एकाच ठिकाणी खरेदी केले 3 मोठे प्लॉट, ही व्यक्ती आहे शेजारी
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan Buy Properties : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या 83 वाढदिवसानिमित्त स्वत:लाच कोट्यवधींचं गिफ्ट दिलं आहे. मुंबईजवळच्या अलिबागमध्ये त्यांनी कोट्यवधी किंमतीचे प्लॉट खरेदी केले आहेत.
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज 11 ऑक्टोबर रोजी आपला 83 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवशी चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास दिवशी अमिताभ यांनी स्वतःला एक आलिशान प्रॉपर्टी भेट म्हणून दिली आहे. त्यांनी मुंबईजवळील अलिबागमध्ये त्यांच्या प्लॉट कलेक्शनमध्ये अजून तीन नवीन प्लॉट खरेदी केले आहेत. शहराच्या जवळच्या आणि शांत परिसरातील रिअल इस्टेटमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. बिग बी यांचे मुंबईतील जुहू परिसरात चार बंगले आहेत. तसेच याआधी अयोध्येतील राम मंदिराच्या परिसरातही त्यांनी प्लॉट खरेदी केला आहे. आता पुन्हा एकदा अलिबागमध्ये त्यांनी प्लॉट खरेदी केला असून ते क्रिकेटर विराट कोहलीचे शेजारी झाले आहे. अलिबागच्या मुनवली परिसरात त्यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यामुळे महानायकावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यासह चाहते नव्या प्रॉपर्टीसाठीही शुभेच्छा देत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली 3 प्लॉट
सीआरई मॅट्रिक्सकडून मिळालेल्या रेकॉर्डनुसार, नव्याने घेतलेले प्लॉट क्रमांक 96, 97 आणि 98 असून एकूण 9,557 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहेत. 7 ऑक्टोबर 2025 रोजी बिग बी यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. अमिताभ बच्चन यांनी त्यावेळी 39.58 लाख रुपये भरत जागा आपल्या नावे केली होती. प्लॉट 96 हा सर्वात मोठा असून 4,047 चौरस फूट आहे आणि त्याची किंमत 2.78 कोटी रुपये आहे. प्लॉट 97 हा 2,776 चौरस फूट असून याची किंमत 1.92 कोटी रुपये आहे. प्लॉट 98 हा 2,734 चौरस फूट असून त्याची किंमत 1,88 कोटी रुपये आहे. ही सर्व प्रॉपर्टी HOABL लँडबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून खरेदी करण्यात आली आहे.
advertisement
अलिबागमध्ये दुसरी प्रॉपर्टी!
अमिताभ बच्चन यांची अलिबागमधील दुसरी प्रॉपर्टी आहे. एप्रिल 2024 मध्ये त्यांनी याच भागात 10 कोटी रुपये देऊन 10,000 चौरस फूटचा एक प्लॉट होबल कंपनीकडून खरेदी केला होता. अलिबाग व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांनी अयोध्यामध्येही गुंतवणूक केली आहे. राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी त्यांनी अयोध्येत 5,372 चौरस फूटचा एक फ्लॉट खरेदी केला होता. अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील जुहू परिसरात जलसा, प्रतीक्षा, जनक आणि वत्सा अशे चार बंगले आहेत. यातील जलसा या बंगल्यात ते राहतात.
advertisement
अभिताभ बच्चन गेल्या 6 दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शहंशाह,जंजीर,डॉन, शोले, मोहब्बते आणि पीकू सारख्या चित्रपटांत जबरदस्त काम केलं. आता अमिताभ बच्चन 2026 गाजवण्यासाठी सज्ज आहेत. कल्कि 2898 पार्ट 2, ब्रह्मास्त्र पार्ट 2, आंखें 2 हे बिग बींचे आगामी प्रोजेक्ट आहेत. या चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 9:21 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी वाढदिवशी स्वत:लाच दिलं महागडं गिफ्ट, एकाच ठिकाणी खरेदी केले 3 मोठे प्लॉट, ही व्यक्ती आहे शेजारी