अशोक मा.मा.च्या हातात बेड्या! मुलामुळे जेलमध्ये जाण्याची वेळ, काय घडलं?

Last Updated:

Ashok Saraf : मुलाच्या एका चुकीमुळे अशोक मा.मा. यांना तुरूंगात जाण्याची वेळ येणार आहे. हे नेमकं कशामुळे झालं.

News18
News18
मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्यांची अशोक मा.मा ही मालिका सध्या जोरदार सुरू आहे. पण या मालिकेत आता ट्विस्ट येणार आहे. अशोक मा.मा. यांना अटक होणार आहे. मालिकेची नवी अपडेट समोर आली आहे. अशोक मा.मा. मालिकेत घरावर संकटाचे सावट घोंघावत आहे. अनिशच्या चुकीमुळे मामांना पोलिस अटक करायला घरात येतात. घरातील सगळ्यांच्या आयुष्यात गोंधळ माजवणाऱ्या अनिशच्या बेपर्वाईमुळे अखेर मामांवर संकट कोसळलं आहे.
हॉस्पिटलमध्ये भरण्याच्या पैशांपासून सुरू झाली. अनिशने ते पैसे न भरल्याचं तुषारला कळताच तो थेट घरात पोहोचतो. अखेर तुषार अनिशविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवतो. यावेळेस देखील अनिशला इन्वेस्टमेंटचे काही पैसे मिळाल्यामुळे तो आणखी अहंकारी होतो. मामांचा त्याच्यावर संशय वाढतो आणि त्यांच्यात मोठा वाद होतो.
advertisement
अनिशला फसवणुकीच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ येते. पण पुन्हाएकदा अशोक मामा पुढे येतात. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अशोक मा.मा. सर्व आरोप स्वतःवर घेतात. या घटनेने घरात मोठी खळबळ माजते. आणि पोलिस मामांना अटक करतात.
आता हा गुंता कसा सुटणार ? पुढे मालिकेत काय घडणार ? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  एकीकडे अनिश मात्र या सगळ्यामुळे अधिकच बिथरतो. दुसरीकडे ऑफिसमध्ये खरा गुन्हेगार सापडणार का ? आणि भैरवीला पुन्हा कामावर बोलवणार का? आणि भैरवी नोकरीवर पुन्हा जाणार ? की बिझनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेणार? हे बघणे उत्सुत्केचे असणार आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
वर्षा वेणूची एक जुनी खंतही व्यक्त करते. अशोक मामा आणि त्यांच्या बहिणीमध्ये झालेला वाद मिटावा आणि जाताना एक पत्र व काही कॅश ठेवून जाते. त्या पत्रात ती लिहिते की तिने वेणूकडून काही वर्षांपूर्वी उसने घेतलेले पैसे परत करते. या सर्व प्रसंगांनंतर भैरवी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करते. पण अनिश आत्मविश्वास गमावून बसतो आणि देव-देव करण्यात गुंतून जातो, ज्यामुळे त्याचं आणि भैरवीचं नातं आणखी ताणतणावाचं होतं.
advertisement
पण या सगळ्यात अनिशच्या फसवणुकीचा पर्दाफाश होणार का ? भैरवीच्या बिझनेसवर त्याचा काही परिणाम होणार का ? आणि त्यामुळे घराला आलेलं संकट अजूनच गडद होणार का? यासाठी अशोक मा.मा. ही मालिका पाहावी लागणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
अशोक मा.मा.च्या हातात बेड्या! मुलामुळे जेलमध्ये जाण्याची वेळ, काय घडलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement