'कायदेशीर बाबींमुळे चित्रपट आत्ता लगेच...', 'क्रांतिज्योती विद्यालय' टीमच्या पोस्टमुळे प्रेक्षकांना धक्का, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Krantijyoti Vidyalay: 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालतोय. मात्र, चित्रपटाच्या टीमच्या एका पोस्टमुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

News18
News18
मुंबई: २०२६ हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी भरभराटीचं ठरलं आहे. १ जानेवारीला नवीन वर्षाचा मुहूर्त साधत प्रदर्शित झालेला 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालतोय. केवळ सहा दिवसांत या सिनेमाने मोठं दिव्य पार करून दाखवलंय. ५ कोटींहून अधिक गल्ला जमवत या चित्रपटाने आपल्या निर्मिती खर्चाच्या दुप्पट कमाई केली आहे.
महाराष्ट्रात मराठी शाळा कमी होत आहेत हे भीषण वास्तव दिग्दर्शक लेखक हेमंत ढोमे याने या चित्रपटात मांडलंय. इंग्रजी आणि परदेशी भाषांच्या झगमगाटात आपली मायबोली आणि आपल्या मराठी शाळा कशा कोलमडत आहेत, याचं हृदयस्पर्शी चित्रण यात दिसतंय. सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आणि प्राजक्ता कोळी यांसारख्या तगड्या कलाकारांच्या अभिनयाने या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. अवघ्या २ कोटींत बनलेल्या या सिनेमाने मोठा पल्ला गाठला आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल जात आहेत.
advertisement

विद्यार्थ्यांना शाळेतच सिनेमा दाखवण्याची शाळांची इच्छा

चित्रपटाची लोकप्रियता पाहून अनेक शाळांनी हा चित्रपट आपल्या विद्यार्थ्यांना शाळेतच दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, यावर चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे. टीमने स्पष्ट केलंय की, तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे चित्रपट सध्या शाळेत दाखवता येणार नाही.
advertisement
क्रांतिज्योती विद्यालयाच्या टीमने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "सर्व शाळांच्या माहितीसाठी! ज्योती विद्यालय नमस्कार, 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट शाळांमध्ये दाखवायचा आहे असं म्हणत अनेक शाळांकडून आम्हाला संपर्क साधला जातोय... काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमुळे आत्ता लगेच चित्रपट शाळेत दाखवण्याचा कार्यक्रम करता येणार नाही! पण हा लोकप्रिय चित्रपट तुम्हाला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दाखवता येणार आहे त्यासाठी लागणारी सर्व मदत आमच्या बाजूने केली जाईल याची आम्ही खात्री देतो."
advertisement
advertisement
टीमने पुढे म्हटलंय, "चित्रपटगृहात चालू असलेला चित्रपट अवैध मार्गाने शाळेत दाखवणे हा कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळे असे कायदेशीर पेच शाळांनी टाळावेत, पुढे कठोर कारवाई होऊ शकते! पण ग्रामीण भागातील शाळांच्या जवळ चित्रपटगृह नसल्याने तिथे फिरते चित्रपटगृह घेऊन येण्याची आमची संकल्पना आहे. परंतु त्याला देखील थोडा वेळ द्यावा लागेल... पण आपल्याला चित्रपट चित्रपटगृहात दाखवायचा असेल तर त्यासाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा! चलचित्र मंडळी 77384 86120"
advertisement
असून यामुळे राज्यातील मराठी शाळांची ढासाळणारी व्यवस्था पुन्हा पूर्ववत होण्याला सुरुवात होऊ शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मराठी शाळांना मिळणार नवसंजीवनी?

'क्रांतीज्योती विद्यालय'ला मिळणारा प्रतिसाद हा सुखावणारा आहे. या चित्रपटाने मराठीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. हा केवळ चित्रपट राहिलेला नाही, तर ती एक चळवळ बनत चालली आहे. प्रेक्षक आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा देत आहेत आणि मराठी शाळांच्या भवितव्याबद्दल गांभीर्याने विचार करू लागले आहेत. हा सिनेमा पाहिल्यावर ढासळणारी शालेय व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, अशी आशा सर्वत्र व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कायदेशीर बाबींमुळे चित्रपट आत्ता लगेच...', 'क्रांतिज्योती विद्यालय' टीमच्या पोस्टमुळे प्रेक्षकांना धक्का, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement