Jacqueline Fernandez : बोल्ड जॅकलिनचं कधीच न पाहिलेलं रुप, प्रत्येक जण करतोय कौतुक, असं केलं काय!
Last Updated:
Jacqueline Fernandez Viral Video : दुर्मिळ आजारग्रस्त बाळासाठी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस खऱ्या अर्थाने देवदूत ठरली आहे. बाळाच्या ऑपरेशनचा खर्च अभिनेत्रीने उचलला आहे.
Jacqueline Fernandez : बॉलिवूडकर अभिनयक्षेत्रात उज्वल आहेतच. पण अनेकदा ही कलाकार मंडळी समाजभान जपताना दिसून येतात. कधी समाजचं आपण काही देणं लागतो या उद्देशाने तर कधी गोरगरिबांना मदत करताना सेलिब्रिटी दिसून येतात. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या एका कृत्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दुर्मिळ आजारग्रस्त बाळासाठी जॅकलिन खऱ्या अर्थाने देवदूत ठरली आहे. बाळाच्या ऑपरेशनचा खर्च अभिनेत्रीने उचलला आहे. त्यामुळे अभिनेत्रीचं चाहत्यांकडून भरभरून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चिमुकल्या बाळाच्या दुर्मिळ आजाराचा संपूर्ण खर्च एका अभिनेत्रीने उचलणं ही खरचं कौतुकास्पद बाब आहे.
जॅकलिन फर्नांडिस व्हिडीओ व्हायरल (Jacqueline Fernandez Video)
जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जॅकलिनसोबत समाजसेविका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हुसैन मंसूरीदेखील पाहायला मिळत आहे. हुसैननेच अभिनेत्रीचा हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जॅकलिन एका चिमुकल्या गंभीर आजारग्रस्त बाळाला भेटताना दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये जॅकलिनने प्रेमाने बाळाला जवळ घेतलं आहे. बाळाला जवळ घेण्यासह त्याच्या कुटुंबियांसहदेखील संवाद साधताना अभिनेत्री दिसत आहे.
advertisement
advertisement
सोशल मीडिया इन्फ्लुअंसर हुसैन मंसूरीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"बाळाच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचल्याबद्दल जॅकलिन फर्नांडिसचे खूप-खूप आभार. त्या खरचं मोठ्या मनाच्या आहेत. आता सर्वकाही उत्तम होईल, अशी आशा करतो. बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करा".
advertisement
हुसैन मंसूरीचा व्हिडीओ अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनेदेखील आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. अभिनेत्रीने लिहिलं आहे,"धन्यवाद हुसैन भाई...बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी सर्वांनीच प्रार्थना करा". जॅकलिनने ज्या बाळाच्या आजाराचा खर्च उचलला आहे त्याला हायड्रोसिफलस नामक दुर्मिळ आजार झाला आहे.
जॅकलिनच्या 'वेलकम टू जंगल'ची प्रतीक्षा
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस शेवटची खिलाडी कुमारच्या 'हाऊसफुल 5' या मल्टीस्टारर चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. अभिनेत्रीचा 'वेलकम टू द जंगल' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, दिशा पटानी अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 3:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Jacqueline Fernandez : बोल्ड जॅकलिनचं कधीच न पाहिलेलं रुप, प्रत्येक जण करतोय कौतुक, असं केलं काय!