या अभिनेत्रीनं विवाहित मुख्यमंत्र्याना घातली होती लग्नाची मागणी; नकार मिळाला अन् घेतला कधीच लग्न न करण्याचा निर्णय

Last Updated:

चित्रपटसृष्टीत अशी एक अभिनेत्री होती जिला लोकांचं प्रेम मिळालं असलं तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ती शेवट्पर्यंत एकटीच राहिली. या अभिनेत्रीनं कधीही लग्न केलं नाही. अभिनेत्रीनं दोघांना लग्नाची मागणी घातली होती, पण नकार मिळाल्यानं ती एकटीच राहिली. लोकांच्या मनात आजही जिवंत असलेल्या या अभिनेत्रीच्या आयुष्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया.

शेवट्पर्यंत एकटीच राहिली अभिनेत्री
शेवट्पर्यंत एकटीच राहिली अभिनेत्री
मुंबई : चित्रपटसृष्टी आणि राजकारणाचं नातं खूप जुनं आहे. अनेक कलाकारांनी आपली अभिनय कारकीर्द संपल्यावर राजकरणात प्रवेश घेऊन नाव कमावलं आहे. अशीच एक अभिनेत्री होती, जी चित्रपटसृष्टीत तर हिट होतीच पण राजकरणातही तिला लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. पण लोकांचं प्रेम मिळालं असलं तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ती शेवट्पर्यंत एकटीच राहिली. या अभिनेत्रीनं कधीही लग्न केलं नाही. अभिनेत्रीनं दोघांना लग्नाची मागणी घातली होती, पण नकार मिळाल्यानं ती एकटीच राहिली. लोकांच्या मनात आजही जिवंत असलेल्या या अभिनेत्रीच्या आयुष्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया.
ही अभिनेत्री म्हणजे तामिळनाडूच्या सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता. त्यांनी 1965 मध्ये ‘वेनिरा आडाई’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी 1961 ते 1980 दरम्यान बालकलाकार म्हणून तर त्यानंतर मुख्य अभिनेत्री म्हणून 140 चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपट आणि राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांचं प्रेमप्रकरणही चर्चेत आलं होतं. हीअभिनेत्री अभिनेते शोभन बाबू आणि एमजी रामचंद्रन (एमजीआर) यांच्या प्रेमात असल्याचं बोललं जातं.
advertisement
'ती मक्का- मदिनाला गेली अन् परत येताच...' अभिनेत्यानं मुस्लिम मुलीसोबत थाटला संसार; नंतर घडलं असं काही
एका फिल्म पार्टीत जयललिता यांची भेट दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते शोभन बाबू यांच्याशी झाली होती. शोभन पत्नी आणि मुलांसह चेन्नईत राहत होता. शोभन विवाहित आहे हे माहित असूनसुद्धा जयललिता स्वतःला त्यांच्या प्रेमात पडण्यापासून रोखू शकल्या नाहीत. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. दोघांचं अनेक काळ अफेअर सुरु होतं. त्यानंतर एके दिवशी जयललिता यांनी शोभनला लग्नाची मागणी घातली, पण तेव्हा शोभनने त्यांची मुले आणि पत्नीमुळे या लग्नाला नकार दिला. हा नकार ऐकून जयललिता खूपच नाराज झाल्या.
advertisement
‘डॉक्टर बाबू’ हा शोभन बाबूचा जयललिता यांच्यासोबतचा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर जयललिता यांनी एमजीआर यांच्या सांगण्यावरून फिल्म इंडस्ट्री सोडली आणि राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. एमजीआरसोबत अभिनेत्रीनं 28 हिट चित्रपट दिले होते. दोघांमध्ये खूप घट्ट नातं होतं. त्यानंतर जयललिता यांनी धैर्य एकवटून एमजीआर यांना लग्नाची मागणी घातली. पण त्यांनी देखील विवाहित असल्यानं या नात्याला नकार दिला. हा नकार जयललिता यांच्या जिव्हारी लागला. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर एमजीआर यांनी जयललिता यांना राजकारणात येण्याची प्रेरणा दिली होती. अभिनेत्रीने त्यांच्या AIADMK या पक्षात प्रवेश केला. एमजीआर यांच्या आश्रयाखाली जयललिता यांची पक्षात झपाट्याने प्रगती झाली.
advertisement
जयललिता यांची पक्षातील प्रमुख व्यक्तींमध्ये गणना होऊ लागली. एमजीआर आणि जयललिता यांच्यातीळ संबंधांची देखील चर्चा होऊ लागली. जेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं तेव्हा एमजीआर यांनी जयललितांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दोघांमधील अंतर वाढत गेलं. दोन्ही स्टार्सना खऱ्या आयुष्यात एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्णच राहिली. जयललिता यांनी कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला, त्या आजन्म एकट्याच राहिल्या.
advertisement
जेव्हा एमजीआर रुग्णालयात शेवटच्या घटका मोजत होते, तेव्हा जयललिता त्यांना भेटायला गेल्या होत्या. मात्र एमजीआर यांच्या कुटुंबीयांनी त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर ‘एमजीआर यांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी’ म्हणून जयललितांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले होतं.
जयललिता 1991 मध्ये त्या तामिळनाडूच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री झाल्या. त्या नंतर त्यांनी सलग सहा वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी मोठे निर्णय घेतले आणि गरिबांसाठी खूप काम केलं. पण 5 डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांचं निधन झालं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
या अभिनेत्रीनं विवाहित मुख्यमंत्र्याना घातली होती लग्नाची मागणी; नकार मिळाला अन् घेतला कधीच लग्न न करण्याचा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement