Raavan Dahan : कंगना मोडणार 50 वर्षांची परंपरा; रामलीलामध्ये करणार रावणाचं दहन

Last Updated:

मागील 50 वर्षांपासून ही प्रथा पुरूष पाळत आले आहेत. मात्र यंदा अभिनेत्री कंगना रणौत ही प्रथा मोडून स्वत:च्या हातानं रावणाचा पुतळा दहन करणार आहे.

कंगना रणौत
कंगना रणौत
मुंबई, 24 ऑक्टोबर : आज देशभरात विजयादशमीचा उत्साह सुरू आहे. देशातील विविध राज्यात विविध ठिकाणी रावणाचं दहन केलं जातं. दिल्लीतही दसऱ्याचा मोठा उत्सव असतो. दिल्लीतील रामलीला हा प्रमुख आकर्षणाचा विषय असतो. लांबून लांबून लोक रामलीला पाहण्यासाठी येत असतात. यंदाची रामलीला खूप खास असणार आहे. कारण यंदा रामलीला झाल्यानंतर महिलांच्या हस्ते रावणाचं दहन करण्यात येणार आहे. आणि हे दहन करणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत आहे. लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे कंगनानं देखील व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
दिल्लीच्या लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात पहिल्यांदा एक महिला रावणाच्या पुतळ्याचं दहन करणार आहे. मागील 50 वर्षांपासून ही प्रथा पुरूष पाळत आले आहेत. मात्र यंदा अभिनेत्री कंगना रणौत ही प्रथा मोडून स्वत:च्या हातानं रावणाचा पुतळा दहन करणार आहे. लव कुश रामलीला समितीच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे की, महिला आरक्षण विधेयकाला संसदेने मंजुरी दिल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
अध्यक्षांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी या कार्यक्रमाला एक VIP व्यक्ती उपस्थित असतात. मागील वर्षी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचप्रमाणे अभिनेता अजय देवगण आणि जॉन अब्राहम देखील सहभागी झाले होते. अभिनेता प्रभासच्या हस्ते रावणाचं दहन करण्यात आलं होतं. यंदा कंगना रणौत रावण दहन करणार आहे.
advertisement
advertisement
"24ऑक्टोबरला मी लाल किल्ल्यांवर आयोजित केलेल्या रामलीलामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहे. मी रावण दहन करण्यासाठी येत आहे. चांगल्या गोष्टींनी वाईटचा नाश करण्यासाठी. तुम्हीही या रामलीलामध्ये सहभागी व्हा. त्याचप्रमाणे 27 ऑक्टोबर माझा तेजस हा सिनेमा देखील पाहायला विसरू नका. हा सिनेमा भारतीय वायुसेनेवर आधारित आहे. लवकरच भेटू", असं आवाहन कंगनानं व्हिडीओ शेअर करत केलं आहे.
advertisement
अभिनेत्री कंगना रणौतच्याचा तेजस हा सिनेमा येत्या 27 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्याचप्रमाणे इमरजन्सी हा सिनेमा 24 नोव्हेंबरला रिलीज होणार होता मात्र सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून सिनेमा 2024मध्ये रिलीज करण्यात करण्यात आलं. दोन बॅक टू बॅक सिनेमे रिलीज होत असल्यानं रावण दहन हा कंगनाचा प्रमोशनल स्टंट असावा असं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Raavan Dahan : कंगना मोडणार 50 वर्षांची परंपरा; रामलीलामध्ये करणार रावणाचं दहन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement