Madhuri Dixit : सीन संपताच माधुरीने रागात सलमानचा हात झटकला, दोघांमध्ये नेमकं काय बिनलसं? Video व्हायरल!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाला 30 वर्षे झाली, पण त्याचा जादू अजूनही कायम आहे. या चित्रपटातील गाणी, संवाद आणि प्रसंग प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत.
मुंबई : ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाला 30 वर्षे झाली, पण त्याचा जादू अजूनही कायम आहे. या चित्रपटातील गाणी, संवाद आणि प्रसंग प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. नुकताच या चित्रपटाशी संबंधित एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये माधुरी दीक्षित आणि सलमान खान एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान दिसत आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये माधुरी अचानक रागाने सलमानपासून हात बाजूला घेते. हे नेमकं काय प्रकरण आहे? याविषयी जाणून घेऊया.
व्हिडिओत नक्की काय दिसतं?
या व्हिडिओमध्ये सलमान खान आणि माधुरी दीक्षित एकत्र नृत्य करताना दिसत आहेत. गाण्याच्या तालावर दोघेही परफॉर्म करत असताना माधुरी एका शॉटनंतर अचानक रागाने हात हलवते आणि निघून जाते. त्याचवेळी सलमान खान स्टेजवर स्तब्ध उभा राहतो, जणू काही घडलेच नाही. काही वेळाने चित्रपटातील लल्लूची भूमिका साकारणारा लक्ष्मीकांत बेर्डे त्याच्याकडे जातो, आणि ते पाहून सलमानही आश्चर्यचकित होतो.
advertisement
माधुरी नेमकी रागावली का?
खरं तर हा सिनेमातील गाण्याचं शुटिंग आहे. त्यातील हा एक भाग आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. अनेक युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी प्रश्न विचारला आहे की, "माधुरी अचानक रागावली का?" तर काहींनी या प्रसंगामागे एखादी मजेशीर घटना असावी, असा अंदाज लावला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. एका युजरने लिहिले, "मी आता पुन्हा हा चित्रपट पाहणार!" तर दुसऱ्याने लिहिले, "सलमान किती शांत उभा राहिला, बहुतेक तोही घाबरला असेल!" काहींनी हे दृश्य शेअर करत म्हटले, "एका गाण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, याचा हा उत्तम पुरावा आहे."
advertisement
advertisement
‘हम आपके हैं कौन’ हा 5 ऑगस्ट 1995 रोजी प्रदर्शित झाला होता. राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती आणि आजही तो कौटुंबिक चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. आज 30 वर्षांनंतरही या चित्रपटाचे प्रसंग आणि त्यामधील कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांच्या हृदयात आहेत. माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या या जुन्या व्हिडिओने पुन्हा एकदा त्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 03, 2025 9:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhuri Dixit : सीन संपताच माधुरीने रागात सलमानचा हात झटकला, दोघांमध्ये नेमकं काय बिनलसं? Video व्हायरल!