'फिल्टरपाड्याच्या बच्चन'ने घेतली नवी कोरी Skoda Kylaq, गौरव मोरेच्या कारची किंमत किती?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
gaurav more buy skoda-kushaq car : इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत गौरव मोरेनं आनंदीची बातमी चाहत्यांना दिली आहे. नवी कार घेतल्यानंतर गौरव मोरे भलताच खुश आहे. त्याच्या कारची किंमत किती आहे?
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळवलेला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच अभिनेता गौरव मोरे. गौरव मोरेच्या करिअरची गाडी सध्या सुसाट सुरू झाली. त्याला आणखी वेग देण्यासाठी गौरव मोरेनं नवीकोरी Skoda Kushaq ही SUV कार खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही आनंदीची बातमी चाहत्यांना दिली आहे. नवी कार घेतल्यानंतर गौरव मोरे भलताच खुश आहे.
Skoda Kushaq ची वैशिष्ट्ये
Skoda Kushaq ही SUV 1.0 लिटर TSI पेट्रोल इंजिनसह येते. जी 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यामध्ये 385 लिटर बूट स्पेस, 50 लिटर फ्युएल टँक आणि 17 kmpl मायलेज आहे.
advertisement
किंमत किती?
Skoda Kushaq ची किंमत मॉडेलनुसार वेगवेगळी आहे. पुण्यात या कारची ऑन-रोड किंमत 12.66 लाखांपासून सुरू होते. गौरव मोरे यांनी कोणते मॉडेल घेतले आहे हे स्पष्ट नाही परंतु अंदाजे 12.5 लाख ते 20 लाखांदरम्यान ही कार असू शकते.
गौरव मोरेचा आनंद
गौरव मोरे यांनी त्यांच्या नवीन कारसोबतचा फोटो शेअर करताना लिहिले आहे, "नवीन प्रवासाची सुरुवात." त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
advertisement
गौरव मोरेचा संघर्ष
गौरव मोरेचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पवईतील फिल्टरपाड्या झोपडपट्टीतून आलेल्या गौरवने आपल्या अभिनय कौशल्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. त्याने 'माझिया प्रीयाला प्रीत कळेना' या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे त्याला खरी प्रसिद्धी मिळाली
गौरव मोरे वर्कफ्रंट
गौरव मोरे सध्या विविध मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्याने 'बाळकडू', 'संजू', 'माऊली', 'विकी वेलिंगकर' यांसारख्या चित्रपटांमध्ये सहायक भूमिका साकारल्या आहेत. 2024 मध्ये त्याचा 'अल्याड पलिकड' हा कॉमेडी-हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारली . याशिवाय, तो 'महापरिनिर्वाण' या आगामी चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 19, 2025 2:56 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'फिल्टरपाड्याच्या बच्चन'ने घेतली नवी कोरी Skoda Kylaq, गौरव मोरेच्या कारची किंमत किती?