'रिलेशनशिपवर आता विश्वास उरला नाही'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली

Last Updated:

Marathi Actress on Relationship : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने आता रिलेशनशिपवर विश्वास राहिलेला नाही, असं वक्तव्य केलं आहे.

News18
News18
Marathi Actress : मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करत यशस्वी झाले आहेत. आयुष्यात आलेल्या कोणत्याही प्रसंगी खचून न जाता त्यांनी त्यावर मात केली आहे. अभिनेत्री नियती राजवाडे हे यापैकीच एक नाव. नियती सध्या तारिणी या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने लग्न, घटस्फोट, दुसरा चान्स, मुलं याबद्दल आपलं मत मांडलं आहे. नियती राजवाडे डिव्होर्सनंतरच्या फेजबद्दल स्पष्ट बोलली आहे. नात्याला . दुसरा चान्स न देण्यामागचं नेमकं कारण तिने सांगितलं आहे.
नियती राजवाडे म्हणाली,"रिलेशनशिपवर आता विश्वास राहिलेला नाही. सध्याच्या घडीला माझ्या मुलासाठी त्याची आई अख्खी त्याची आहे. उद्या जर मी वेगळ्या माणसाचा विचार केला तर कुठेतरी मी विभागले जाईल. आधीच तो एका सिंगल पॅरेन्टबरोबर आयुष्य काढत आहे. त्याला गरज आई किंवा बाबा दोघांचीही आहे आणि ती जर व्यक्ती त्याच्यासोबत नसेल, काही कारणाने वेळ देऊ शकत नसेल. त्यामुळे मग मी जर सिंगल मदर आहे तर त्याला मी वेळ देईल, त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची जबाबदारी माझी आहे".
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)



advertisement
नियती पुढे म्हणाली,"ही एक प्रकारे माझी इन्वेस्टमेंट आहे विथ नो रिटर्न. त्याने मला परत तेवढा वेळ द्यावा, अशी माझी अजिबाद अपेक्षा नाही. कारण उद्या तो मोठा होणार त्याचं त्याचं जगणार पण कुठेतरी मला माझ्या मुलाबद्दल प्रचंड विश्वास आहे. कारण काहीही झालं तरी आई मी तुला सोडून कुठे जाणार नाही हे तो आता बोलतोय आणि पुढे जाऊन अक्कल आल्यानंतरही तो हेच बोलेल यावर माझा विश्वास नव्हे आत्मविश्वास आहे. मला कित्येक रात्र झोप यायची नाही. माझं राहतं घर होतं. त्या ओळखीच्या नावचं माझं स्वत:चं घर होतं. ते एका रात्रीत मला सोडावं लागलं. एका भाड्याच्या घरात येऊन राहायचं. मग तिथे भाडं भरणं, लाइटबिल भरणं, मी जर बाहेर गेले तर माझ्या मुलाला कसं सांभाळलं जाईल, हा विचार असायचा. आपला मुलगा सेफ हॅन्डमध्ये असावा हे नेहमीच बॅक ऑफ द माईंट असतं". नियतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'रिलेशनशिपवर आता विश्वास उरला नाही'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement