2025 ची महाफ्लॉप फिल्म, 400 कोटी गेले पाण्यात, पण OTT वर येताच NO. 1; 'ही' स्पाय थ्रिलर पाहून लागेल वेड
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
OTT Top Trending Movie : २०२५ मधील ज्या महा फ्लॉप सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रोड्युसर्सना मोठा लॉस करून दिला होता, तो सध्या ओटीटीवर नंबर-१ वर ट्रेंड होत आहे.
मुंबई : चित्रपटगृहांमध्ये सपाटून आपटलेली एखादी फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊन रातोरात 'हिट' होऊ शकते, याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. २०२५ मधील ज्या महा फ्लॉप सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रोड्युसर्सना मोठा तोटा करून दिला होता, त्याच चित्रपटाचे नशीब आता ओटीटीवर पूर्णपणे पालटले आहे. तब्बल २ तास ५३ मिनिटांचा हा चित्रपट सध्या एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नंबर-१ वर ट्रेंड होत असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
४०० कोटींचे बजेट, १८५ कोटींची कमाई
बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरलेला हा चित्रपट आहे, ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांची प्रमुख भूमिका असलेला 'वॉर २'. १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या या स्पाय थ्रिलरकडून खूप अपेक्षा होत्या. २०१७ मधील 'वॉर' प्रमाणे हा चित्रपटही कमाईचे रेकॉर्ड तोडेल असे मानले जात होते.
advertisement
मात्र, तसे झाले नाही. ४०० कोटी रुपयांच्या अवाढव्य बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे लाईफटाईम कलेक्शन केवळ १८५.१३ कोटी रुपयांवर थांबले, ज्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या हा एक मोठा आपत्कालीन फ्लॉप ठरला.
OTT वर 'बंडखोर एजंट'चा जलवा!
'वॉर २' चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला आणि त्याचे नशीब त्वरित पलटले! ओटीटी रिलीजच्या अवघ्या ४ दिवसांपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सातत्याने नंबर-१ वर ट्रेंड होत आहे.
advertisement
advertisement
चित्रपटाची कथा एका बंडखोर गुप्त एजंटभोवती फिरते, ज्याच्यावर आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप असतो. गुप्तचर यंत्रणा त्याच्या शोधात आहेत, पण तो त्यांना अनेकदा चकमा देतो. राजकीय व्यवस्था सुरक्षा प्रणालीला कशी पोखरून काढत आहे, याची झलकही या थरारक कथेत पाहायला मिळते. हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर 'वॉर' चा सीक्वेल आहे.
advertisement
बॉक्स ऑफिसवरील मोठ्या नुकसानानंतर, आता ओटीटीवर मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे निर्मात्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रेक्षक आता घरात आरामात बसून या भव्य अॅक्शन थ्रिलरचा आनंद घेत आहेत. ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर या दोन सुपरस्टार्सचा ऑन-स्क्रीन अॅक्शनचा जलवा आता ओटीटीवर इतिहास रचत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 10:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
2025 ची महाफ्लॉप फिल्म, 400 कोटी गेले पाण्यात, पण OTT वर येताच NO. 1; 'ही' स्पाय थ्रिलर पाहून लागेल वेड