Anchal Tiwari : 'पंचायत 2' फेम अभिनेत्री जिवंत! अपघातात जीव गमावल्याच्या बातमीवर सोडलं मौन

Last Updated:

'पंचायत 2' या वेब सिरीजमध्ये झळकलेली अभिनेत्री आंचल तिवारीच्या अकाली मृत्यूवर हळहळ व्यक्त केली जात होती. तिला चाहते श्रद्धांजली वाहत होते. पण आता या अभिनेत्रीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. तिचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. आता 'पंचायत 2' फेम अभिनेत्रीनं स्वतः व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे.

'पंचायत 2' फेम अभिनेत्री
'पंचायत 2' फेम अभिनेत्री
मुंबई : मंगळवारी 27 फेब्रुवारी रोजी सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली होती. 'पंचायत 2' या वेब सिरीजमध्ये झळकलेली अभिनेत्री आंचल तिवारीचं निधन झाल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. बिहारमधील मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाली गावाजवळ 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांमध्ये तिचाही समावेश आल्याचं सांगण्यात आलं होतं. या अभिनेत्रीच्या अकाली मृत्यूवर हळहळ व्यक्त केली जात होती. तिला चाहते श्रद्धांजली वाहत होते. पण आता या अभिनेत्रीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. तिचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. आता 'पंचायत 2' फेम अभिनेत्रीनं स्वतः व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे.
'पंचायत 2' फेम अभिनेत्री आंचल तिवारीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधून तिने तिच्या मृत्यूची बातमी खोटी
असून ही अफवा पसरवणाऱ्यांवर राग व्यक्त केला आहे. पण तिचं नाव या बातमीत का आलं, काय म्हणाली आंचल या व्हिडिओत जाणून घ्या.
रिहानाने घातला लेहंगा तर शेरवानीत मार्क झुकरबर्ग; अनंत राधिकाच्या लग्नात असे दिसतील स्टार्स; पाहा AI PHOTOS
व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणाली, 'माझं नाव आंचल तिवारी आहे, काल तुम्ही 'पंचायत 2' फेम अभिनेत्री आंचल तिवारीचं निधन झाल्याची बातमी पहिली असेलच. पण ती आंचल तिवारी दुसरी कोणीतरी आहे, ती एक भोजपुरी अभिनेत्री आहे. 'पंचायत 2' मधली आंचल तिवारी आता तुमच्यासमोर उभी आहे. मी पूर्णपणे सुरक्षित असून ती बातमी खोटी आहे.' असं तिने म्हटलंय.
advertisement
View this post on Instagram

A post shared by Anchal Tiwari (@anchalt555)

advertisement
पुढे आंचल म्हणाली, 'माझा भोजपुरी सिनेसृष्टीशी काहीही संबंध नाही. मी हिंदी सिनेमात काम करते. हिंदी रंगभूमीवर मी काम केलं आहे. त्यामुळं कृपया मला भोजपुरी सिनेसृष्टीशी जोडू नका. या खोट्या बातमीमुळं मला मानसिक यातना सहन कराव्या लागल्या आहेत.''असं म्हणत तिने संताप व्यक्त केला आहे.
सोबतच काही दिवसांपूर्वी पूनम पांडेने एक पब्लिसिटी स्टंट केला होता. त्यामुळं आता आंचलची तुलना पुनमशी केली जातेय. आता आंचलने याविषयी देखील मत व्यक्त केलं आहे. ती म्हणाली, 'माझी तुलना लोकांनी पूनम पांडेशी केली आहे. पण असं काही नाहीये. माझी यात काहीही चूक नाही' असं म्हणत तिने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही अभिनेत्री जिवंत असल्यानं चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Anchal Tiwari : 'पंचायत 2' फेम अभिनेत्री जिवंत! अपघातात जीव गमावल्याच्या बातमीवर सोडलं मौन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement