सतत एकमेकींशी भांडण्याऱ्या सासू-सुनांनी प्रार्थना-निर्मिती सावंतचा Video बघायलाच हवा, 29 व्या सेकंदाला येईल डोळ्यात पाणी

Last Updated:

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Teaser : 'बाईपण भारी देवा' या सिनेमानंतर दिग्दर्शक केदार शिंदे 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. सिनेमाचा धमाल टीझर रिलीज झाला आहे. 

News18
News18
सासू-सुनांची भांडणं प्रत्येक नवऱ्यासाठी काही नवीन नसतात. प्रत्येक घरात सासू-सुनांची भांडणं झाली नाहीत तर संसार होत नाही असं म्हणतात. पण याच सासू-सुनांची तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था असते. सासू-सुनांची हिच गोष्ट एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इथे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सून आहे तर अभिनेत्री निर्मिती सावंत तिची सासू झाली आहे. दररोज एकमेकींशी भांडणाऱ्या सासू-सुनांनी हा टीझर पाहायलाच पाहावाच लागेल. टीझरच्या 29 व्या मिनिटाला डोळ्यात पाणी येईल.
'बाईपण भारी देवा' या सिनेमानंतर दिग्दर्शक केदार शिंदे 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. सिनेमाचा धमाल टीझर रिलीज झाला आहे.  या सिनेमाच्या निमित्तानं प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. सासू-सुनेची एक हटके, ताकदवान आणि तितकीच खमंग जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
टीझरमध्येच दोघींची जुगलबंदी, टोमणे, मिश्किल संवाद आणि भावनिक क्षण यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतोय. प्रार्थना बेहरे आधुनिक, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून दिसत आहे, तर निर्मिती सावंत पारंपरिक, ठाम मतांच्या आणि अनुभवसंपन्न सासूबाईंच्या भूमिकेत आहेत.
advertisement
दोन पिढ्या, दोन विचारधारा आणि दोन कणखर स्त्रिया यांच्यातील नात्याचं गोड-तिखट, हलकंफुलकं तरीही अर्थपूर्ण चित्रण या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. समाजात नेहमी म्हटलं जातं की, प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते', परंतु एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री ठामपणे उभी राहिली तर, ती नाती किती बळकट होऊ शकतात, हाच विचार हा चित्रपट अतिशय सहज आणि प्रभावीपणे मांडतो.
advertisement
सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "ही कथा आजच्या काळातील सासू-सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या आहेत, स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद होतात, नोकझोक होते, परंतु त्याचबरोबर दोघींच्या समजूतदारपणाची आणि त्यांच्या तरल नात्याची सुंदर कहाणी यात आहे. सासू आणि सून एकमेकींच्या आयुष्यात आधार बनू शकतात, ही भावना या चित्रपटाचा गाभा आहे."
advertisement
'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा सिनेमात सासू–सुनेच्या नात्याची एक नवी, ताजीतवानी आणि विचारप्रवर्तक ओळख देणारी आहे. येत्या 16 जानेवारी पासून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
सतत एकमेकींशी भांडण्याऱ्या सासू-सुनांनी प्रार्थना-निर्मिती सावंतचा Video बघायलाच हवा, 29 व्या सेकंदाला येईल डोळ्यात पाणी
Next Article
advertisement
BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement