'बाईपण जिंदाबाद'च्या पहिल्या एपिसोडमध्ये प्रार्थना बेहेरे-सुकन्या मोनेंची भन्नाट केमिस्ट्री, हसून हसून दुखेल पोट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
कलर्स मराठीवरील ‘बाईपण जिंदाबाद’ मालिकेत सुकन्या मोने, शुभांगी गोखले आदी अभिनेत्री स्त्रीत्वाचे विविध पैलू उलगडणार आहेत. २६ ऑक्टोबरपासून रविवारी रात्री ८ वाजता.
मुंबई : मराठी प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणाऱ्या कथांची मालिका घेऊन कलर्स मराठी वाहिनी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. यंदा ते घेऊन येत आहेत एक खास अँथॉलॉजी मालिका ‘बाईपण जिंदाबाद’. ही मालिका म्हणजे स्त्रीच्या अनेक रूपात दडलेले तिचे अद्वितीय सामर्थ्य, तिचा संघर्ष आणि तिच्या अस्तित्वाचा भव्य उत्सव आहे.
आई-पत्नीच्या पलीकडे 'ती' कोण आहे?
ती घरातल्या प्रत्येकासाठी असते. कधी मुलांच्या आनंदात स्वतःला विसरून जाणारी मायाळू आई, कधी पतीच्या संकटात ढाल बनून उभी राहणारी खंबीर पत्नी, तर कधी नव्या घरात रुजणारी समजूतदार सून. पण या सगळ्या नात्यांच्या ओझ्याखाली दबून न जाता, ती स्वतः कोण आहे - एक विचारशील, संवेदनशील आणि ठाम व्यक्तिमत्व हा प्रवास ही मालिका उलगडणार आहे.
advertisement
‘बाईपण जिंदाबाद’ ही फक्त एक मालिका नाही; तर तुटलेल्या स्वप्नांना सांधून पुन्हा नव्याने उभं राहण्याची हिंमत दाखवणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनाचा आरसा आहे. कारण, ती फक्त जगत नाही, ती जीवन घडवते!
मराठीतील टॉप अभिनेत्री एकाच मंचावर!
या मालिकेसाठी मराठीतील अनेक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री एका समान धाग्याने जोडल्या गेल्या आहेत. सुकन्या मोने, शुभांगी गोखले, सुचित्रा बांदेकर, क्रांती रेडकर, शलाका पवार, दीपा परब, उर्मिला कोठारे आणि प्रार्थना बेहेरे या अभिनेत्री वेगवेगळ्या कथांमधून स्त्रीत्वाचे वेगवेगळे पैलू दाखवणार आहेत.
advertisement
पहिली कथा: 'असिस्टंट माझी लाडकी' मालिकेच्या पहिल्या कथेत स्वप्नाळू माधवी एका वर्कहोलिक बॉसच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करताना दिसणार आहे. या दोन भिन्न आणि मजबूत व्यक्तिमत्त्वांमध्ये टक्कर होणार की मैत्रीचे नवे नाते जुळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
advertisement
advertisement
मालिकेतील प्रत्येक भाग स्त्रीचं धैर्य, तिचा आत्मसन्मान आणि स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रवास दर्शवतो. समाजाच्या साचेबद्ध चौकटीत अडकून न राहता ती स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा हक्क मिळवते. तिचं बाईपण म्हणजे फक्त त्याग नव्हे, तर प्रेम, जीवनसृजन आणि आत्मभानाचं प्रतीक आहे. हा हृदयस्पर्शी प्रवास २६ ऑक्टोबरपासून, दर रविवारी रात्री ८ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर पाहायला मिळेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 8:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'बाईपण जिंदाबाद'च्या पहिल्या एपिसोडमध्ये प्रार्थना बेहेरे-सुकन्या मोनेंची भन्नाट केमिस्ट्री, हसून हसून दुखेल पोट