Rahul Vaidya : ‘इतकाच पुळका आहे तर...’ भटक्या कुत्र्यांवरील वादात राहुल वैद्य संतापला, सांगितला जीवघेणा अनुभव!

Last Updated:

Supreme Court Order on Stray Dogs : दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासावर सर्वोच्च न्यायालयाने कुत्र्यांना निवारागृहात हलवण्याचे आदेश दिले आहेत. गायक राहुल वैद्यने या निर्णयाला उघडपणे पाठिंबा दिला आहे.

News18
News18
मुंबई : दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. कोर्टाने या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवून निवारागृहात हलवण्याचे आदेश दिले आहेत. यावर अनेक कलाकार कोर्टाच्या निर्णयाला विरोध करत आहेत, पण गायक राहुल वैद्यने मात्र या निर्णयाला उघडपणे पाठिंबा दिला आहे.

'कुत्रे आवडतात, पण...'

राहुल वैद्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करताना म्हटलं आहे की, 'मी माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करतो. मला कुत्रा हा प्राणी खूप आवडतो, पण गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, फिरणारे कुत्रे समाजाची निष्काळजीपणा दर्शवतात, करुणा नाही.'
राहुलने सोशल मीडियावर दिखावा करणाऱ्या लोकांना एक जोरदार टोला लगावला आहे. तो म्हणाला, 'जर भटक्या कुत्र्यांवर इतकाच जीव असेल, तर कृपया त्यांना तुमच्या घरी घेऊन जा! फक्त सोशल मीडियावर मोठ्या स्टोरीज टाकून आणि न्यायालयाच्या निर्णयावर टीका करून वाद निर्माण करू नका.'
advertisement
advertisement

'आई-वडिलांना कुत्र्याने चावा घेतला तर...?'

राहुलने या निर्णयावर टीका करणाऱ्यांना एक थेट प्रश्न विचारला आहे. तो म्हणाला, 'माझा शेवटचा प्रश्न: जर तुमच्या आई-वडिलांना किंवा मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला, तर तुमचा दृष्टिकोन असाच राहील का?'
राहुलने यासोबतच एक जुना अनुभवही सांगितला. २०२१ मध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याने पाळलेल्या भटक्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला होता. राहुलने त्या जखमेचा फोटोही शेअर केला, पण त्या अभिनेत्याचं नाव मात्र सांगितलं नाही. त्याचा मुद्दा फक्त त्या लोकांबद्दल आहे, जे या निर्णयाच्या विरोधात जात आहेत.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ११ ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ५ हजार कुत्र्यांसाठी निवारागृह तयार करण्याची सूचना केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rahul Vaidya : ‘इतकाच पुळका आहे तर...’ भटक्या कुत्र्यांवरील वादात राहुल वैद्य संतापला, सांगितला जीवघेणा अनुभव!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement