Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस, वारीच्या रंगात रंगली रिंकू राजगुरू; नऊवारी साडीतील खास VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rinku Rajguru अभिनेत्री रिंकू राजगुरूने यंदा वडिलांसोबत पंढरपूरच्या वारीत सहभाग घेतला. तिने या क्षणाचा खास व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
मुंबई : महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणजे आषाढी वारी. दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या भेटीसाठी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरची पायपीट करत पंढरपूरकडे जातात. भजन, किर्तनात दंग होऊन, हरीनामाचा जप करत वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वाटचाल करतात. तहान भूक सर्व विसरून विठूरायाच्या भक्तीत दंगून जातात. सर्वजण वारीत सहभागी होऊन हा खास क्षण अनुभवतात. अभिनेत्री रिंकू राजगुरुनेही वारीत सहभागी झाली.
अभिनेत्री रिंकू राजगुरूने यंदा वडिलांसोबत पंढरपूरच्या वारीत सहभाग घेतला. तिने या क्षणाचा खास व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
रिंकू राजगुरु वारीत झाली सहभागी
कपाळी गंध, हातात टाळ आणि पायात ठेका धरत रिंकूने वारीचा आनंद घेतला. पारंपरिक नऊवारी साडी, नाकात नथ आणि डोक्यावर तुळस घेऊन ती पारंपरिक मराठमोळ्या रूपात दिसली. विशेष म्हणजे ती वडिलांसोबत फुगडी खेळताना आणि इतर महिला वारकऱ्यांमध्ये मिसळून पारंपरिक खेळांमध्ये सहभागी होताना दिसली. तिच्या आनंदात भक्तीची झलक स्पष्टपणे दिसत होती.
advertisement
रिंकूने तिच्या इंस्टाग्रामवर वारीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्याखाली लिहिलं, “जय जय राम कृष्ण हरी! मी वयाच्या 4 व्या वर्षी माझ्या बाबांसोबत वारीत गेले होते. आज तब्बल 20 वर्षांनी पुन्हा तेच क्षण जगतेय... हे क्षण माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत.”
advertisement
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. “तुझं साधेपण मनाला भावलं”, “तू खरी कलाकार आहेस, जमिनीवर पाय ठेवून चालणारी” अशा अनेक सकारात्मक प्रतिक्रियांनी तिच्या व्हिडीओवर पहायला मिळत आहेत. विठ्ठलाच्या नामस्मरणात गुंग झालेली रिंकू राजगुरू आता चाहत्यांच्या हृदयातही अधिकच जागा निर्माण करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 03, 2025 3:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस, वारीच्या रंगात रंगली रिंकू राजगुरू; नऊवारी साडीतील खास VIDEO