खरंच दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे सोनम कपूर? बेबी बंप लपवताना दिसली, VIDEO VIRAL
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार असून करवा चौथला अनिल कपूर यांच्या घरी दिसली. सोनम यावेळी तिचा बेबी बंप लपवताना दिसली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांआधीच तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची बातमी समोर आली होती.. सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रेग्नंसीची बातमी समोर आल्यानंतर सोनम पहिल्यांदा स्पॉट झाली. तिच्या स्पॉट होण्याचं निमित्तं ठरलं करवा चौथ. सोनम कपूर करवा चौथसाठी तिचे वडील अनिल कपूर यांच्या घरी पोहोचली. लाल आणि सोनेरी साडी परिधान केलेली सोनम खूपच सुंदर दिसत होती. यावेळी ती साडीचा पदर सावतर तिचा बेबी बंप लपवताना दिसली. सोनमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडिओमध्ये, सोनम कारमध्ये बसलेली दिसते. ती एका हाताने पापाराझींना हाय करतेय तर तिचा दुसरा हात तिच्या पोटावर आहे. ती व्हिडीओमध्ये हसताना दिसतेय. तिचं हसणं आणि वागणं यातून ती प्रेग्नंट असल्याचं अखेर समोर आलं आहे.
advertisement
सोनम कपूरने अद्याप तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची बातमी अधिकृतपणे सांगितलेली नाही. मे 2018 मध्ये आनंद अहुजा आणि सोनम यांनी लग्न केलं. दोघांना 2022 मध्ये वायु हा पहिला मुलगा झाला. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, सोनम दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून ती लवकर प्रेग्नंसीची बातमी सर्वांना सांगणार आहे.
अलीकडेच, सोनमने तिची चुलत बहीण अंशुला कपूरच्या साखरपुड्यालाही हजेरी लावली होती. तिथेही तिने पापाराझींना फोटो देण्यास नकार दिला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वृत्तानुसार, एका काही माणसांनी पापाराझींना त्यांचे कॅमेरे खाली करण्याची विनंती केली. ज्यामुळे सोनम शांतपणे समारंभाच्या ठिकाणी पोहचू शकेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 4:01 PM IST