Border 2 च्या टीझरमध्ये सनी देओलचा रुद्र अवतार! सावत्र बहीण ईशाने भावावर व्यक्त केलं जाहीर प्रेम

Last Updated:

Border 2 Teaser: १९९७ साली संपूर्ण देशाला देशभक्तीच्या रंगात रंगवणाऱ्या 'बॉर्डर'चा सीक्वल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुमारे दोन मिनिटांच्या या टीझरमध्ये सनी देओलचा तोच जुना करारी बाणा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.

News18
News18
मुंबई: येत्या २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा 'देओल' नावाचं वादळ येणार असून, त्याची पहिली ठिणगी पडली आहे ती म्हणजे 'बॉर्डर २' च्या निमित्ताने! १९९७ साली संपूर्ण देशाला देशभक्तीच्या रंगात रंगवणाऱ्या 'बॉर्डर'चा सीक्वल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. १६ डिसेंबर रोजी 'विजय दिवस' साजरा करत मेकर्सनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आणि काही मिनिटांतच या टीझरने सोशल मीडियाचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढले.

अंगावर शहारे आणणारा टीझर!

सुमारे दोन मिनिटांच्या या टीझरमध्ये सनी देओलचा तोच जुना करारी बाणा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सोबतच वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार सीमेवर शत्रूशी दोन हात करताना दिसत आहेत. टीझर पाहून अक्षरशः अंगावर शहारे येतात. सनी देओलने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत एक धमाकेदार कॅप्शन दिले, "आवाज कुठपर्यंत जायला हवा?" सनी देओलच्या या प्रश्नावर आता थेट त्याच्या सावत्र बहिणीने उत्तर दिलं आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)



advertisement

नात्यातील दुरावा विसरून दिलेली दाद!

सनी देओलने शेअर केलेल्या या टीझरला २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, पण त्यात एका लाईकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही लाईक दुसरी तिसरी कोणाची नसून सनीची सावत्र बहीण ईशा देओल हिची आहे. देओल कुटुंबात गेल्या काही काळात निर्माण झालेला दुरावा आता कमी होताना दिसत आहे. ईशाने या टीझरला लाईक करून आपल्या भावाच्या कामाचे आणि हिंमतीचे कौतुक केले आहे. केवळ ईशाच नाही, तर 'धुरंधर' फेम अभिनेता अर्जुन रामपाल यानेही या टीझरवर आपली पसंती दर्शवली आहे.
advertisement

दु:खाच्या सावटातही कर्तव्याला प्राधान्य

देओल कुटुंबासाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे सनी देओल आणि संपूर्ण कुटुंब दु:खात बुडाले आहे. मात्र, वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून सनी देओलने 'बॉर्डर २' च्या टीझर लॉन्चला उपस्थिती लावली. वडिलांच्या निधनानंतर सनी सार्वजनिकरीत्या पहिल्यांदाच या कार्यक्रमात दिसला.
advertisement

कधी रिलीज होणार फिल्म?

जेपी दत्ता आणि भूषण कुमार यांची निर्मिती असलेला आणि अनुराग सिंह यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. १९९७ च्या मूळ 'बॉर्डर'चा वारसा हा सिनेमा किती प्रभावीपणे पुढे नेतो, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Border 2 च्या टीझरमध्ये सनी देओलचा रुद्र अवतार! सावत्र बहीण ईशाने भावावर व्यक्त केलं जाहीर प्रेम
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement