Jalebi Teaser Release : 'माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका...'; स्वप्निल जोशीचा नवा क्राइम-थ्रिलर सिनेमा, Teaser

Last Updated:

Marathi Crime Thriller Movie : अभिनेता स्वप्निल जोशी प्रमुख भुमिकेत असलेला नवा क्राइम-सस्पेन्स सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

स्वप्निल जोशी
स्वप्निल जोशी
मुंबई : क्राइम-थ्रिलर सिनेमा आणि वेब सीरिजचा ट्रेंड सुरू आहे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात अशा प्रकाराचा कॉन्टेट पाहण्यास प्राधान्य देताना दिसतात. मराठी इंडस्ट्री देखील यात कुठे कमी नाही. काही दिवसांआधी लाइक आणि सब्सक्राइब नावाचा एक थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता त्यानंतर आता अभिनेता स्वप्निल जोशी प्रमुख भुमिकेत असलेला नवा क्राइम-सस्पेन्स सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जिलबी असं सिनेमाचं नाव असून सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. दोघे पहिल्यांदा एकत्र एका सिनेमात दिसणार आहे.  ‘मला ना गोल गोल फिरवता येत नाही’ मी डायरेक्ट पॉईंट वर येतो. ‘एकदा सुरू झालं ना..की मुळासकट सगळं बाहेर निघेल..! अशा दमदार संवादांसह जिलेबीचा टिझर रिलीज झाला आहे. अभिनेता स्वप्निल जोशी यात डॅशिंग पोलीस अधिकारी विजय करमरकरच्या भुमिकेत आहे.  घटना-प्रसंगांतून निर्माण झालेले गूढ उकलताना उद्योगपती सौरव सुभेदार डॅशिंग पोलीस अधिकारी विजय करमरकर याची मदत घेतात.
advertisement
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद सांगतो, ‘वेगवेगळया भूमिका आणि उत्तम कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं.’ ‘जिलबी’ च्या निमित्ताने एक वेगळी भूमिका करण्याची संधी मिळाली. अत्यंत रुबाबदार, सगळ्या क्षेत्रात दबदबा आणि मानसन्मान असेलला उद्योगपती सौरव सुभेदार करताना मला ही तितकीच मजा आली. गोड आणि गूढ असे दोन्ही स्वाद देणारी ‘जिलबी’ प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील.
advertisement
advertisement
‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. स्वप्निल जोशी आणि प्रसाद यांच्यासह अभिनेत्री शिवानी सुर्वे देखील या सिनेमात प्रमुख भुमिकेत आहे.  ‘जिलबी’ सिनेमा 17 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Jalebi Teaser Release : 'माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका...'; स्वप्निल जोशीचा नवा क्राइम-थ्रिलर सिनेमा, Teaser
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement