पाठीवर 7, छातीवर 4 वार, जगप्रसिद्ध रॅपरला 14 वेळा चाकूने भोसकलं, पोलिसांच्या डोळ्यादेखत झाला हल्ला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tory Lanez Attack : एका फेमस कलाकाराला तुरुंगातच गंभीर हल्ल्याला सामोरे जावे लागले आणि त्याच्या जीवावर बेतले. या घटनेमुळे संपूर्ण हिप-हॉप जगतात खळबळ उडाली आहे.
मुंबई : अमेरिकेत घडलेल्या एका घटनेमुळे सध्या सगळीकडेच गदारोळ उडाला आहे. एका फेमस कलाकाराला तुरुंगातच गंभीर हल्ल्याला सामोरे जावे लागले आणि त्याच्या जीवावर बेतले. या घटनेमुळे संपूर्ण हिप-हॉप जगतात खळबळ उडाली आहे. कॅलिफोर्नियातील एका उच्च-सुरक्षा असलेल्या सुधारगृहात ही घटना घडली. या कलाकारावर तुरुंगातच एका दुसऱ्या कैद्याने अचानक १४ वेळा चाकूने वार केले.
प्रसिद्ध रॅपर टोरी लेनेझसोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. त्याच्या पाठीवर ७, धडावर ४, डोक्याच्या मागच्या भागवर २ आणि चेहऱ्यावर १ अशा गंभीर जखमा झाल्या आहेत. या गंभीर अवस्थेत त्याची दोन्ही फुफ्फुसे बंद पडली होती आणि त्याला तात्काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ही माहिती खुद्द या रॅपरच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, "त्याच्या स्थितीमध्ये आता हळूहळू सुधारणा होत आहे. तो स्वतः श्वास घेऊ शकतो आणि कोणत्याही वैरभावाशिवाय सामान्य संवाद साधत आहे. तो जखमी असूनही सकारात्मक आहे आणि सर्वांच्या प्रार्थनांसाठी आभार मानतो."
advertisement
advertisement
टोरी लेनजने त्याच्या 'ट्रॅप हाउस' हिटने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. टोरीचे खरे नाव आहे डेस्टार पीटरसन. सध्या तो मेगन द स्टॅलियन या रॅपरवर २०२० मध्ये गोळी झाडल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा भोगत आहे.
हल्ल्याच्या वेळी टोरी लेनज कॅलिफोर्निया रिफॉर्म्ड इंस्टिट्यूट, तहचापी येथे बंदिस्त होता. या हल्ल्यानंतर त्याला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत देण्यात आली आणि बाहेरील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. या घटनेमागील नेमका उद्देश किंवा कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कायदा आणि तुरुंग प्रशासनाकडून तपास सुरू असून, हल्लेखोर कैद्याबाबत अजून खुलासा करण्यात आलेला नाही.
advertisement
हिप-हॉप चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. एकीकडे कोर्टाने गुन्ह्यामुळे शिक्षा सुनावलेली असतानाच, आता टोरीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर टोरी लेनजसाठी प्रार्थनांचा ओघ सुरू आहे आणि चाहते त्यांच्या लवकर बऱ्या होण्याची आशा करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 5:33 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पाठीवर 7, छातीवर 4 वार, जगप्रसिद्ध रॅपरला 14 वेळा चाकूने भोसकलं, पोलिसांच्या डोळ्यादेखत झाला हल्ला