Kidney Stone in Winter: हिवाळ्यात वाढतो किडनी स्टोनचा धोका, आत्ताच बदला ‘या’ चुकीच्या सवयी अन्यथा येईल पश्चातापाची पाळी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Tips to avoid Kidney Stone Risk in Winter: हिवाळ्यात किडनीवर पडलेल्या दबावामुळे किडनी स्टोन होण्याची भीती असते. त्यामुळे तुम्हाला हिवाळ्यात किडनी स्टोनला दूर ठेवण्यासाठी या 5 टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरू शकतील.
मुंबई: लोकांना हवाहवासा हिवाळा काहींसाठी डोकेदुखीचा ठरतो. पावसाळ्या इतकाच हिवाळ्यातही साथीच्या आजारांचा धोका असतो. त्याचं कारणंही तसंच आहे. हिवाळ्यात थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे किडनीवरही दबाव वाढतो. शरीरातील अतिरिक्त द्रव आणि हानिकारक रसायनं काढून टाकण्यासाठी किडनींना अधिक रक्त प्रवाहाची आवश्यकता असते, परंतु रक्तवाहिन्यां आकुंचन पावल्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात रक्त मिळत नाही आणि किडन्यांवर अतिरिक्त दबाव वाढतो. त्यातच अनेक जण थंडीत कमी पाणी पितात, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट व्हायला लागतं. ज्यामुळे ब्लडप्रेशर वाढून किडन्यांवरचा दबाव आणखी वाढतो. या सर्व कारणांमुळे हिवाळ्यात किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे हिवाळ्यात तुम्हाला आणि तुमच्या किडनीला फिट ठेवायचं असेल तर या सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्ही किडनी स्टोनचा धोका टाळू शकता.
या 5 चुकीच्या सवयींमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका
1) कमी पाणी पिणे
हिवाळ्याच्या थंडीमुळे अनेकदा कमी तहान लागते. त्यामुळे आपण पाणी कमी पितो.मात्र याचा सर्वात मोठा फटका हृदय आणि किडन्यांना बसू शकतो. कमी पाणी पायल्यामुळे डिहायड्रेशन होऊन किडनीवरचा दबाव वाढून किडनी स्टोनचा धोका अनेक पटींनी वाढतो.
2) व्हिटॅमिन डीची कमतरता
advertisement
हिवाळ्यात सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. किडनीच्या कार्यासाठी व्हिटॅमिन डी एक महत्त्वाचं जीवनसत्त्व आहे. त्यामुळे ज्या अन्नपदार्थातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल असे अन्नपदार्थ तुम्ही खा अथवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घ्या. जेणेकरून किडनीचं कार्य सुरळीत राहून किडनी स्टोनचा धोका टळू शकतो.
advertisement
3) हालचाल न करणे
हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जण एकाच जागी बसून राहणं पसंत करतात. त्यामुळे त्यांची हालचाल कमी होते. याचा परिणाम चयापचयावर होऊन त्याची गती मंदावते. त्यामुळे वजन वाढायला लागतं. वाढलेल्या वजनामुळे दुसऱ्या आजारांची भीती निर्माण होते याशिवाय किडन्यांवर दबाव येऊन किडनी स्टोनचा धोका वाढतो.
4) आहार
थंडीमुळे चयापचय क्रिया आधीच मंदावलेली असते. त्यातच मासांहार, खारट पदार्थ आणि ऑक्सलेटयुक्त भाज्यांमुळे किडनी स्टोन होण्याची भीती असते. त्यामुले हिवाळ्यात सकस आणि पौष्टिक आहार घेण्याकडे भर द्या.
advertisement
5) मद्यपान
मद्यपान हे शरीरासाठी केव्हाही हानिकारकच आहे. वाढत्या थंडीचा सामना करण्यासाठी अनेकजण मद्यपान करतात किंवा हिवाळ्यात त्यांचं मद्यपानाचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे शरीरारतलं रक्त शुद्ध करण्यासाठी किडनीवर अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे किडनी स्टोनची भीती वाढते.
advertisement
हिवाळ्यात किडनी स्टोन टाळण्यासाठी उपाय:
हिवाळ्यात तुम्हाला तहान जरी नाही लागली तरी ठराविक वेळेनंतर पाणी पित पाहा. तुमचा आहार साधा मात्र पौष्टिक असू द्या. आहारात सलाडचा वापर वाढवा. व्हिटॅमिन सी युक्त फळं खा. जेवणानंतर हलका व्यायाम करा जेणेकरून तुमच्या किडनीवर दबाव येणार नाही आणि हिवाळ्यातल्या संभाव्य किडनीस्टोनचा धोका तुम्हाला टाळता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 23, 2024 7:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kidney Stone in Winter: हिवाळ्यात वाढतो किडनी स्टोनचा धोका, आत्ताच बदला ‘या’ चुकीच्या सवयी अन्यथा येईल पश्चातापाची पाळी