Tomatoes trigger smoking cravings? ऐकावं ते नवलच! टोमॅटो खाल्ल्यानं होते सिगारेट पिण्याची इच्छा? टोमॅटोत खरंच असतं निकोटीन?

Last Updated:

Fact Check Tomatoes trigger smoking cravings? निकोटीन हा नैसर्गिकरित्या आढळणारा पदार्थ आहे जो अनेक वनस्पतींमध्ये आढळून येतो. त्यामुळे फक्त टोमॅटोच नाही तर वांगी, बटाटा, वांगी, सिमला मिरची अशा नाईटशेड कुटुंबातल्या जवळपास सर्वच वनस्पतींमध्ये निकोटीन आढळून येतं.

प्रतिकात्मक फोटो : ऐकावं ते नवलच! टोमॅटो खाल्ल्यानं होते सिगारेट पिण्याची इच्छा?
प्रतिकात्मक फोटो : ऐकावं ते नवलच! टोमॅटो खाल्ल्यानं होते सिगारेट पिण्याची इच्छा?
मुंबई : भाजी मंडई जेव्हा आपण काही खरेदी करायला जातो तेव्हा आपली नजर सगळ्यात आधी पडते ती टोमॅटोवर. लालचुटूक, लालबुंद टोमॅटो सगळ्यांना आवडतात. टोमॅटो  खाणं हे आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. अनेक भाज्या, सलाड मध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे जंक फूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर्गर आणि सँडविचमध्येसुद्धा त्यांचा वापर केला जातो. टोमॅटोत लायकोपीन, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम सारखे घटक असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय टोमॅटोत असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे अंगदुखी, सांधेदुखी किंवा जळजळीच्या आजारांवार टोमॅटो खाणं फायद्याचं मानलं जातं. टोमॅटोमुळे शरीरातले वाईट किंवा विषारी पदार्थ बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे टोमॅटो खाल्ल्यामुळे शरीर आतून स्वच्छ म्हणजेच डिटॉक्स व्हायला मदत होते.
आता टोमॅटोचे इतके फायदे असताना टोमॅटोविषयी एक बातमी इंटरनेट आणि सोशल मीडियावर वायरल होते आहे की, टोमॅटो खाल्ल्याने सिगारेट पिण्याची इच्छा तीव्र होते. सोशल मीडियावर अनेक अशा पोस्ट आढळून आल्या आहेत की टोमॅटोमध्ये निकोटीन असतं आणि टोमॅटो खाल्ल्यानंतर सिगारेट ओढण्याची तल्लफ वाढते. या बातमीत कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट आहारतज्ज्ञांशी संपर्क साधला. पाहुयात ते काय म्हणतात ते.
advertisement
हेल्थ कोच इशा लाल यांच्या मते, निकोटीन हा नैसर्गिकरित्या आढळणारा पदार्थ आहे जो अनेक वनस्पतींमध्ये आढळून येतो. नाईटशेड कुटुंबातल्या जवळपास सर्वच वनस्पतींमध्ये  निकोटीन आढळून येते. त्यामुळे फक्त टोमॅटोच नाही तर तर वांगी, बटाटा, वांगी, सिमला मिरची यामध्ये पण निकोटीन आढळून येतं. मात्र यात असलेल्या निकोटीनचं प्रमाण हे खूप अल्प किंबहुना अत्यल्प असतं ज्याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम दिसून येत नाही. उदा. 100 ग्रॅम टोमॅटोमध्ये 0.0008 मिलीग्राम निकोटीन असतं. तर एका सिगारेटमध्ये सुमारे 10 मिलीग्रॅम निकोटीन असतं. याचा अर्थ असा की, जर तुम्ही 100-100 ग्रॅम टोमॅटो एक लाख वेळा खाल्ले तर तुम्हाला एका सिगारेट मध्ये असलेलं निकोटीन मिळेल. तुमच्याकडून इतके टोमॅटो संपूर्ण आयुष्यात खाण्याची सुताराम शक्यता नाहीये. त्यामुळे टोमॅटोत असलेलं निकोटीन हे नगण्य मानलं जातं. कारण त्यापासून कोणतंही नुकसान होत नाही.
advertisement

टोमॅटो खाल्ल्यानंतर सिगारेटची तल्लफ होते का?

टोमॅटोत निकोटीन नगण्य प्रमाणात असतं, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर सिगारेट पिण्याची तल्लफ येण्याचा कोणताही प्रश्न नाहीये. ईशा लाल म्हणतात की, ‘आजपर्यंत असं कोणतंही संशोधन समोर आलेलं नाही की, टोमॅटो किंवा इतर अन्न खाल्ल्याने सिगारेटची तीव्र इच्छा होते. जेव्हा निकोटीन शरीरात प्रवेश करतं तेव्हा ते थेट रक्तात पोहोचतं आणि त्वरीत मेंदूपर्यंत पोहोचते, ज्यामुळे त्याची संवेदनशीलता वाढते.मात्र पण टोमॅटोमध्ये निकोटीन जरी असलं तरीही त्याचं प्रमाणे हे नगण्य असल्यामुळे टोमॅटो खाल्ल्याने सिगारेट पिण्याची इच्छा होते किंवा तल्लफ निर्माण होते असं म्हणणं  चुकीचं आहे.
advertisement
टोमॅटोत असलेल्या फायबर्समुळे पोट भरलेलं राहतं आणि पचनक्रिया सुधारून वजनही नियंत्रणात राहायला मदत होते. त्यामुळे टोमॅटो खाणं हे आरोग्यासाठी फायद्याचं असून तुम्ही बिनधास्तपणे टोमॅटो खाऊ शकता. मात्र टोमॅटोचा वापर या सुयोग्य आणि मर्यादित प्रमाणात करा कारण ‘अति तिथे माती’ ही म्हण लक्षात ठेवा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tomatoes trigger smoking cravings? ऐकावं ते नवलच! टोमॅटो खाल्ल्यानं होते सिगारेट पिण्याची इच्छा? टोमॅटोत खरंच असतं निकोटीन?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement