केसांचं झडणं, केस गळणं आणि कोंड्यावर 1 उपाय! घरीच बनवा तेल, Recipe

Last Updated:

जर तुमचे केस गळत असतील आणि आहे त्या केसांची वाढच होत नसेल, विंचरताना केस अगदी मुळापासून उपटले जात असतील. तर...

दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावा.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावा.
शुभम सिंग बसोनिया, प्रतिनिधी
भोपाळ : आजकालच्या धावपळीच्या जीवनात केसगळती सामान्य झाली आहे. त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र असं दुर्लक्ष केल्यानंच कधी टक्कल पडतं हे कळतही नाही. पावसाळ्यात तर केसगळती जास्त वाढते. त्यामुळे या काळात केसांची काळजी घेणं अत्यावश्यक असतं. त्यासाठी फार महागडे शॅम्पू किंवा तेल वापरायला हवं असं काही नाही. तर, आपण घरच्या घरी काही साधे उपाय करूनही केसगळती थांबवू शकतो.
advertisement
कडूलिंबाच्या पानांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. केसांच्या आरोग्यासाठी तर ही पानं अतिशय फायदेशीर ठरतात. केसगळती, केसांचं झडणं, डोक्यावर फोड येणं, केसांमध्ये कोंडा होणं, इत्यादींवर कडूलिंबाची पानं रामबाण असतात. जर तुमचे केस गळत असतील आणि आहे त्या केसांची वाढच होत नसेल, विंचरताना केस अगदी मुळापासून उपटले जात असतील. तर कडूलिंबाच्या पानांचा उपाय करायला काही हरकत नाही.
advertisement
सर्वात आधी कडूलिंबाची 200 ग्रॅम पानं घ्यायची. ती एका पातेल्यात 200 मिली लिटर तिळाच्या तेलात बुडवायची. हे मिश्रण गॅसवर ठेवून बारीक आचेवर शिजवायचं. पूर्णपणे शिजून गरम झाल्यानंतर हे तेल गाळून एका बाटलीत भरून ठेवा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावा.
advertisement
घरच्या घरी तयार केलेल्या या जबरदस्त तेलानं जवळपास 5 मिनिटं केसांच्या मुळांना व्यवस्थित मसाज करा. 3 ते 5 दिवसांतच तुम्हाला केसांमध्ये फरक दिसू लागेल. तर, 2 ते 3 महिन्यांमध्ये केसांचं झडणं, केसगळती आणि डोक्यावर आलेल्या फोडांवर, कोंड्यावर आराम मिळू शकेल.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
केसांचं झडणं, केस गळणं आणि कोंड्यावर 1 उपाय! घरीच बनवा तेल, Recipe
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement