Tooth Cavity - दातांमधल्या किडीला वैतागलात ? अशाप्रकारे करा गुळण्या...दातांमध्ये अडकलेले किडे होतील गायब
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दात किडण्याचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीनं तुम्हाला यातून मुक्तता मिळू शकेल.
मुंबई : दात म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग...पण जर तुमच्या दातांचा रंग पिवळा असेल आणि ते किडलेले असतील तर तुमचं हास्य आणि तुमच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होतो. जेव्हा दातांवर स्तर तयार होतात आणि दात किडतात तेव्हा त्यामध्ये लहान खड्डे तयार होतात. या किडण्यामुळे दात पोकळ होऊ लागतात. दात स्वच्छ नसणं, तोंडात झालेला जीवाणूंचा संसर्ग, गोड पदार्थांचं अतिसेवन किंवा आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या यामुळे दातांचं मोठं नुकसान होतं. तुम्हालाही दात किडण्याचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीनं तुम्हाला यातून मुक्तता मिळू शकेल.
या समस्येवर उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. तुमच्या स्वयंपाकघरात सापडलेल्या काही गोष्टी तुमची समस्या दूर करू शकतात.
लसूण -
तुमच्या स्वयंपाकघरात असलेला लसूण जेवणाची चव तर वाढवतोच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. लसणाचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. लसणात असलेले अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म हे एक उत्कृष्ट वेदनाशामक आहेत, ज्यामुळे दातदुखी आणि जंतांपासून आराम मिळतो. तुम्ही लसूण कच्चाही खाऊ शकता.
advertisement
लिंबू -
advertisement
लिंबाच्या सेवनानं दात किडण्याचा त्रास कमी होऊ शकतो. लिंबू व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत मानला जातो. यामध्ये असलेले ऍसिड जंतू मारून वेदना कमी करण्यास मदत करतात. लिंबाचा तुकडा तोंडात ठेवा आणि तो चावा आणि नंतर स्वच्छ पाण्यानं तोंड धुवा. यामुळे दुखण्यापासून तसंच किडीपासून आराम मिळू शकतो.
मीठ -
मीठामुळे कोणत्याही पदार्थाची चव चांगली होऊ शकते किंवा बिघडू शकते. दात किडणं आणि दुखणं यावर उपचार करण्यासाठी मीठ पाणी हे समीकरण खूप उपयुक्त ठरू शकतं. यामुळे तोंड जीवाणंपासून मुक्त राहतं आणि दातांमधला चिकटपणा देखील काढून टाकण्यात मदत होते. खारट पाणी तोंडातील आम्ल काढून तोंडाची पीएच पातळी सामान्य करू शकते. हे घरगुती उपाय आहेत, यानंतरही दातदुखी कायम असेल आणि दात किडत असतील तर दंतवैद्याचा सल्ला नक्की घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2024 6:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tooth Cavity - दातांमधल्या किडीला वैतागलात ? अशाप्रकारे करा गुळण्या...दातांमध्ये अडकलेले किडे होतील गायब