पनीर की अंडी? उन्हाळ्यात खाण्यासाठी बेस्ट काय? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

Last Updated:

आत्ताच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात अंडी किंवा पनीर खायला हवीत का? शरीर फिट ठेवायचं असेल तर कोणता बेस्ट ऑप्शन असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याबद्दल आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे काय सांगतात पाहुयात.

+
News18

News18

निरंजन कामत, प्रतिनिधी 
कोल्हापूर : सध्याच्या युगात आपलं शरीर फिट ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. वजन नियंत्रित करण्यासाठी, काही लोक आपल्या आहारात अंडी आणि पनीरच सेवनही करतात, कारण दोन्हीमध्ये कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त असतात. आहार तज्ज्ञांच्या मते अंडी हे सुपरफूड आहे तर त्याचबरोबर जर आपण पनीरचा विचार केला तर यातही कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात आणि शाकाहारी लोकांसाठी पनीर हे वरदान आहे. पण आत्ताच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात अंडी किंवा पनीर खायला हवीत का? शरीर फिट ठेवायचं असेल तर कोणता बेस्ट ऑप्शन असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याबद्दल आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे काय सांगतात पाहुयात.
advertisement
उन्हाळ्यात अंडी खावीत की नाही?
अंडी हे सुपरफूड असून ते अनेक लोकांच्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ आहे. अंडी रोज खाल्ली जातात. उन्हाळ्यात अंडी खाणे टाळावे असा एक समज अनेकांमध्ये आढळून येतो. मात्र ऋतू कोणताही असो, मर्यादित प्रमाणात अंडी खायला पाहिजे. अंडी आपल्याला उष्णतेचा सामना करण्यास मदत करते. अंडीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक असतात जे आपले एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करतं. दमट हवामानात अंडी खाण्याचा परिणाम व्यक्तीपरत्वे बदलत असतो, असं आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे सांगतात. 
advertisement
काही लोकांना असं वाटतं की उन्हाळ्यात अंडी खाणे चांगले नाही शिवाय त्यामुळे पचनक्रियावर परिणाम होतो. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे खरं तर प्रथिनांचं जास्त सेवन टाळणे ही चांगली सवय आहे. कारण प्रथिनांचं सर्वाधिक सेवन आपल्या चयापचयवर परिणाम करतं. तरी देखील तुम्हाला प्रथिनांसाठी अंडी खायची असेल तर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग खावा. अंडी आपल्या शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखते जे उन्हाळ्यात अत्यंत आवश्यक मानले जाते. कारण शरीरात द्रव नसल्यामुळे निर्जलीकरण आणि इलेक्ट्रोलायटीक असंतुलन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढण्याची भीती असते. अंड्यांमध्ये उच्च घनतेचे लिपोप्रोटीन्स असतात जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करतात. त्याशिवाय हृदयाशी संबंधित विकार दूर ठेवत हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवतात, असं आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे सांगतात. 
advertisement
पनीरमधील प्रोटीनचे प्रमाण
अंड्याप्रमाणे पनीरमध्येही मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. 100 ग्रॅम पनीरमध्ये जवळजवळ 18 ग्रॅम प्रोटीन असते, जे अंड्याच्या तुलनेत अधिक आहे. याशिवाय पनीर कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत मानला जातो. याचा फायदा शरिरातील हाडांना होतो. अंड्याच्या तुलनेत पनीरमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. पण पनीर पचण्यास थोडे कठीण होऊ शकते. खासकरून लॅक्टोजपासून अ‍ॅलर्जी असणाऱ्या व्यक्तींना पनीर खाल्ल्याने समस्या उद्भवू शकते. पनीरपासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. पनीरचा पराठा, भाजी, पकोडे अशा रेसिपी केल्या जातात. गोड पदार्थांमध्येही पनीरचा वापर केला जातो, असं आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे सांगतात. 
advertisement
पनीर की अंड? दोघांमधील बेस्ट ऑप्शन
अंड आणि पनीर दोन्ही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. पण आहारासंबंधित गरजा आणि प्राथमिकतेनुसार तुम्ही अंड अथवा पनीरची निवड करू शकता. संपूर्ण प्रोटीन आणि अन्य आवश्यक पोषण तत्वांसाठी अंड्याचे सेवन करू शकता. पण शरीरात कॅलरीज कमी ठेवायच्या असल्यास पनीर उत्तम पर्याय आहे. वजन कमी करण्यासाठी दोन्ही गोष्टी योग्य पर्याय आहेत. प्रथिने हळूहळू पचत असल्याने आपले पोट बराच काळ भरलेले राहते. आपण एकाच वेळी अंडी आणि पनीर खाऊ शकता, यात काही नुकसान नाही. पण या सगळ्यांचं जास्त प्रमाणात सेवन करणे देखील योग्य नाही, असंही आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे यांनी सांगितलं. 
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पनीर की अंडी? उन्हाळ्यात खाण्यासाठी बेस्ट काय? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement