लग्नाची वरात निघताना वधू तांदूळ मागे का फेकते? जाणून घ्या खरं कारण
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पाठवणीच्या वेळी वधू म्हणजे नवरी मुलगी ताटातील तांदूळ मागे फेकते आणि नंतर मागे वळून पाहत नाही.
वर्धा, 12 डिसेंबर: हिंदू धर्मातील विवाहांमध्ये प्रत्येक विधी आणि प्रथेला विशेष महत्त्व सांगितले जाते. लग्नादरम्यान होणारे प्रत्येक विधी कोणत्या ना कोणत्या कारणाने केले जातात. प्रत्येकाची स्वतःची श्रद्धाभावनाही असते. लग्नाच्या निरोपाच्या वेळी म्हणजे पाठवणीच्या वेळी वधू म्हणजे नवरी मुलगी ताटातील तांदूळ मागे फेकते आणि नंतर मागे वळून पाहत नाही हे तुम्ही पाहिलं असेल. मात्र हा विधी का केला जातो? या प्रथेमागे नेमकी काय परंपरा आहे किंवा काय भावना असतात? हे वर्धा येथील पंडित हेमंत शास्त्री पाचखेडे यांच्याकडून जाणून घेऊयात.
अशी असते रीत
लग्नाच्या दिवशी सर्व रीती पार पडल्यानंतर वरात निघताना महिलांनी वधूची ओटी भरली जाते. त्यातले तांदूळ वधू पाच वेळा दोन्ही हाताने ओंजळीत भरून मागे फेकते. हे तांदूळ जोराने मागे फेकताना वधूच्या मागे असलेल्या महिला ते तांदूळ आपल्या पदरात झेलत असतात. ही विधी केल्याने वधूचे माहेर आणि वधू धनधन्याने सदैव समृद्ध असते अशी मान्यता आहे. खरंतर वधू म्हणजेच मुलगी ही आई-वडिलांची मुलगीच नाही तर ती घरची लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे ती दुसऱ्याच्या घरी जाताना या विधीतून आई-वडिलांप्रति कृतज्ञता व्यक्त करत असते, अशी माहिती पंडित हेमंत शास्त्री सांगतात.
advertisement
तांदूळ फेकण्याचं कारण
वास्तविक असं मानलं जातं की मुलगी ही घरची लक्ष्मी असते. जर तिने पाठवणीच्या वेळी हा विधी केला तर तिच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. जेव्हा वधू तांदूळ मागे फेकते तेव्हा ती अपेक्षा करते की धन धान्याने संपन्न असो. दुसरीकडे, असाही एक विश्वास आहे की हा विधी आपल्या पालकांना आणि कुटुंबाचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत त्यांनी तिच्यासाठी जे काही केले त्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते, असंही पाचखेडे महाराज सांगतात.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
Dec 12, 2023 3:38 PM IST









