How To Remove Body Odor : घामाची दुर्गंधी विसरा! हे 10 हॅक्स वापरा, उन्हाळ्यातही येणार नाही बॉडी स्मेल

Last Updated:

कितीही स्वच्छता बाळगली तरी घराबाहेर पडल्यावर उष्णता आणि घामाने शरीर ओलं होताच. त्यामुळे मग शरीराचा वास येऊ लागतो. बऱ्याचदा ही लाजीरवाणी गोष्ट बनते.

News18
News18
मुंबई : उन्हाळा म्हणलं की, गर्मी घाम आणि त्यामुळे येणार शरीराचा दुर्गंध. या अगदी त्रासदायक गोष्टी असतात. कितीही स्वच्छता बाळगली तरी घराबाहेर पडल्यावर उष्णता आणि घामाने शरीर ओलं होताच. त्यामुळे मग शरीराचा वास येऊ लागतो. बऱ्याचदा ही लाजीरवाणी गोष्ट बनते. खरं तर घामातील बॅक्टेरियाच्या वाढीमुळे घामाला दुर्गंधी येऊ लागते.
बऱ्याचदा या दुर्गंधीमुळे लोक जवळ बसणं तालुक्यता, दुर्गंधीनाशक किंवा परफ्यूम लावल्यानेही दुर्गंधीपासून आराम मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी वारंवार आंघोळ केली तर घामाचा वास दूर ठेवता येतो. पण दिवसभर बाहेर काम करणाऱ्यांना ते शक्य होत नाही. म्हणूनच आज आम्ही काही हॅक घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घामाचा वास सहजपणे दूर ठेवू शकता.
advertisement
घामाचा वास दूर ठेवण्यासाठी उपाय..
- एक बाटली पाण्याने भरा आणि त्यात अर्धा कप सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. शरीराच्या त्या भागांवर शिंपडा जेथे घाम येतो. यामुळे वास दूर राहील.
- शूज उघडताच पायाला वास येत असेल तर रबिंग अल्कोहोल घ्या आणि शूजवर शिंपडा. यानंतरच शूज घाला. त्वचेवर हे अजिबात लावू नका. यामुळे पाय किंवा मोज्यांचा वास येणार नाही.
advertisement
- तुमच्या हाताच्या खड्ड्यातून वास येत असेल तर नेहमी धुतलेला शर्ट किंवा टी-शर्ट घाला. टी-शर्ट न धुता वारंवार घातल्यास वास वाढतो.
- जिममध्ये जाताना सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटन किंवा नैसर्गिक फॅब्रिकचे कपडे घाला. यामध्ये बॅक्टेरिया सहजासहजी वाढत नाहीत आणि वासही येत नाही.
- जिममधून आल्यानंतर घामाचे कपडे धुवावे लागतात, तेव्हा धुण्याआधी एक बादली पाणी आणि एक कप बेकिंग सोडाच्या द्रावणात काही वेळ भिजवून ठेवा. त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येणार नाही.
advertisement
- जेवणात कांदा, लसूण किंवा जास्त मसाले वापरू नका. हे खाल्ल्याने शरीराचा वासही तीव्र होतो. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या.
- जेव्हाही आंघोळीला जाल तेव्हा एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून अंगावर लावा. 15 मिनिटांनी आंघोळ करा.
- गुलाबपाणी सोबत ठेवा आणि दर काही तासांनी बगल याच्या साहाय्याने पुसा किंवा ते अंडरआर्म्समध्ये स्प्रे करा.
advertisement
- तुमचे कोणतेही आवडते तेल कोरफडीच्या जेलमध्ये टाका आणि ते तुमच्या काखेत लावा. याने वास निघून जाईल.
- अजूनही शरीरातून दुर्गंधी येत राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले. हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
How To Remove Body Odor : घामाची दुर्गंधी विसरा! हे 10 हॅक्स वापरा, उन्हाळ्यातही येणार नाही बॉडी स्मेल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement