Women Success Story: पतीची नोकरी गेली, महिलेने सुरू केले पराठा सेंटर, महिन्याला 70 हजार कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Women Success Story: व्यवसायात नवीन असल्याने अनेक अडचणींवर मात करत आज राधिका यांनी नाशिकमध्ये त्यांच्या पराठ्याची चव कानाकोपऱ्यात पोचवली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्या 60 ते 70 हजाराचे उत्पन्न देखील दर महिन्याला घेत आहेत.
नाशिक: पतीच्या हाताची नोकरी गेली म्हणून नाशिकमधील राधिका क्षत्रीय या महिलेने आपले घर चालवण्यासाठी उत्तर दक्षिणी या नावाने पराठा सेंटर सुरू केले आहे. व्यवसायात नवीन असल्याने अनेक अडचणींवर मात करत आज राधिका यांनी नाशिकमध्ये त्यांच्या पराठ्याची चव कानाकोपऱ्यात पोचवली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्या 60 ते 70 हजाराचे उत्पन्न देखील दर महिन्याला घेत आहेत.
राधिका यांचे पती एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पदावर होते. परंतु काही हेल्थ प्रॉब्लेम्समुळे त्यांना त्यांची हाताची नोकरी ही सोडावी लागली. मुले लहान, त्यांचा शिक्षणाचा खर्च, आपले घर कसे चालणार याकरिता राधिका यांनी आपणच काहीतरी करूया या विचाराने सुरुवातीला घरातच एक ब्युटी पार्लर सुरू केले. सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानक जीवनात पुन्हा कोरोना महामारीच्या रूपाने आणखीन एक संकट आले. जेमतेम आता कुठेतरी आपली चांगली सुरुवात झाली असे विचार करताच मोठा दुःखाचा डोंगर हा परिवारावर आला होता. परंतु यातून काही तोडगा काढावा लागणार म्हणून कोरोना काळानंतर पुन्हा पार्लर सुरू केले.
advertisement
परंतु आता पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आपण काहीतरी दुसरा व्यवसाय सुरू करू या विचाराने राधिका आणि त्यांच्या पतीने पराठा सेंटर सुरू करण्याचे ठरवले आणि ते त्यांनी सुरू देखील केले. व्यवसायात नवीन असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु हार मानली तर सर्व हातातून चालले जाणार याकरिता दोघेही जिद्दीने सर्व अडचणींना सामोरे जात राहिले. आज त्यांचे फळ त्यांना मिळत आहे.
advertisement
आज राधिका यांचा उत्तर दक्षिणी या नावाचा पराठा संपूर्ण नाशिकमध्ये प्रसिद्ध झाला आहे. सुरुवातीला 5 पराठे यांनी सुरू केले होते परंतु आता खवय्यांचा प्रतिसाद पाहून राधिका आता तब्बल 60 प्रकारचे पराठे हे बनवत असतात. तसेच त्यांच्या जीवनात अडचणी आल्या त्या कुणालाही येऊ नये याकरिता राधिका या कुठल्याही गरजू आणि होतकरू मुलींना काही वस्तू बनवणे शिकवून एक रोजगार देत असतात. सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जात आज राधिका या दर महिन्याला 60 ते 70 हजाराचे उत्पन्न देखील घेत असतात. इतकेच नाही तर आज ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना देखील रोजगार पुरवत आहेत.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
July 06, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Success Story: पतीची नोकरी गेली, महिलेने सुरू केले पराठा सेंटर, महिन्याला 70 हजार कमाई