Benefits of Curd and Tulsi: रिकाम्या पोटी दही आणि तुळशीचा रस एकत्र पिण्याने होतील ‘इतके’ फायदे,
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Curd and Tulsi together: तुळस ही आरोग्यासाठी फायद्याची आहे. रोज सकाळी तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक फायदे होतात. तर दही हे उत्तम नैसर्गिक प्रो-बायोटिक मानलं जातं. या दोघांना एकत्र करून त्यांचा वापर केल्यास त्यांचे फायदे द्विगुणीत होतात.
जाणून घेऊयात दही आणि तुळस एकत्र खाण्याचे 5 फायदे.
1) वजन कमी करण्यात फायदेशीर
दही आणि तुळशीचा रस एकत्र करून प्यायल्याने वजन कमी व्हायला मदत होते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे चयापचय वाढून अन्न पचायला आणि अतिरिक्त कॅलरीज जळायला मदत होते. दह्याप्रमाणे तुळशीचा रसही शरीरातली अतिरिक्त चरबी जाळायला मदत करतो शिवाय शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतो. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी दही आणि तुळशीचा रस एकत्र घेतल्याने केल्याने वजन कमी व्हायला मदत होते.
advertisement
2) त्वचेसाठी फायद्याचं
दही आणि तुळशीचं मिश्रण एकत्र करून ते त्वचेवर लावलं तर त्वचेचं आरोग्य सुधारायला मदत होते. दह्यात असलेलं लॅक्टिक ॲसिड, त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकायला मदत करतं. तुळशीच्या रसात असलेले अँटिऑक्सिडेंट आणि अँटिबॅक्टेरिअल गुणधर्म बॅक्टेरियाची वाढ रोखतात. यामुळे त्वचेवर असलेले डाग आणि मुरुम दूर व्हायला मदत होते. दही आणि तुळशीचा पानांचा रस एकत्र करून नियमित वापरल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते.
advertisement
3) पचन सुधारतं
दही आणि तुळस यांचं एकत्र करून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारायला मदत होते. दह्यात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांमुळे पचनशक्ती मजबूत होऊन अपचन, गॅसेस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. तर तुळशीचा रसामुळे पोटाची जळजळ आणि ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते.
advertisement
4) तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त
दही आणि तुळशीच्या एकत्र सेवनाने शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोन्सचं उत्पादन कमी होतं. मानसिक ताण वाढवायला हे हार्मोन कारणीभूत असतं. त्यामुळे हार्मोन्सचं उत्पादन कमी झाल्याने मानसिक ताण कमी होऊन मन प्रसन्न राहायला मदत होते. रात्री झोपताना 2 चमचे दह्यासोबत एक तुळशीचं पान खाल्ल्यावर शांत झोप लागू शकते.
advertisement
5) रोग प्रतिकारशक्ती वाढते
तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीराला रोगांपासून वाचवतात. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात. त्यामुळे तुळस आणि दही एकत्र करून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन शरीराचं आरोग्य सुधारायला मदत होते.
advertisement
कसं वापरायचं ?
आधी 8 ते 10 तुळशीची पानं धुवून ती वाटून घ्या.त्यात २ चमचे दही घाला. ते नीट एकत्र करून घ्या. रोज सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने वजन कमी व्हायला मदत होईल. जर तुम्हाला तुळशीचं पान खाणं आवडतं असेल तर तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 20, 2024 3:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Curd and Tulsi: रिकाम्या पोटी दही आणि तुळशीचा रस एकत्र पिण्याने होतील ‘इतके’ फायदे,