नकारात्मक शक्ती, तणावापासूनही मिळते मुक्ती, तुळशीचे असेही आहेत फायदे, जाणून घ्या, अधिक माहिती..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
ज्योतिषाचार्य पंडित शत्रुघ्न झा यांनी सांगितले की, ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रह दोष असेल तर तो तुळशीच्या मुळाच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो.
गुलशन कश्यप, प्रतिनिधी
जमुई : हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशीच्या रोपाचे महत्त्व पौराणिक आहे आणि तुळशीला भगवान विष्णूचा सर्वात प्रिय भाग मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते ते घर खूप पवित्र होते आणि तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते. यासोबतच ज्या घरात तुळशीचे रोप असते, त्या घरावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा असते आणि यामुळे कुटुंबात नेहमी सुख-शांती राहते, असेही मानतात.
advertisement
पण यासोबतच तुळशीचे रोपच नाही तर तुळशीची मूळेही घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशीच्या मुळामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होतात. याशिवाय तुळशीच्या मुळामुळे अनेक प्रकारचे ग्रह दोष दूर होतात. ज्योतिषी पंडित शत्रुघ्न झा यांनी याबाबत माहिती दिली. तुळशीचे रोप आपल्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, ते जाणून घेऊयात.
सर्व ग्रहांच्या शांतीसाठी लाभदायक -
ज्योतिषाचार्य पंडित शत्रुघ्न झा यांनी सांगितले की, ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रह दोष असेल तर तो तुळशीच्या मुळाच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो. तुळशीची पूजा करून तिच्या मुळाचा थोडासा भाग काढावा. यानंतर लाल रंगाच्या कपड्यात किंवा तावीज घालून स्वतःला बांधून घ्या, तर सर्व ग्रह दोष शांत होतात.
advertisement
नकारात्मक शक्तींचा होतो नाश -
जर तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल तर तीदेखील तुळशीच्या मुळाच्या मदतीने दूर केली जाऊ शकते. त्यासाठी तुळशीच्या मुळाचा हार करून मंदिरात किंवा इतर ठिकाणी ठेवा. असे केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
तणावापासूनही मिळते मुक्ती -
ज्योतिषाचार्य यांनी पुढे बोलताना सांगितले की, तुळशीच्या मुळामुळे तणावापासून मुक्ती मिळते. यासाठी तुळशीच्या मुळाची माळा तयार करुन घ्यावी. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता. जर तुम्ही ही माळा नेहमी गळ्यात घातली तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. याशिवाय, सर्व प्रकारच्या नकारात्मक उर्जेपासून संरक्षण होईल.
advertisement
इतकेच नव्हे तर जर तुम्हाला कोणत्याही कामात सतत अपयश येत असेल तर यासाठीही तुळशीचे मूळ खूप फायदेशीर ठरू शकते. तुळशीचे थोडे मूळ घेऊन गंगाजलाने धुवा. यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कपड्यात बांधून आपल्याजवळ ठेवा, त्याचा नक्कीच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
सूचना : ही माहिती ज्योतिषांनी सांगितली आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Jamui,Bihar
First Published :
January 03, 2024 8:38 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नकारात्मक शक्ती, तणावापासूनही मिळते मुक्ती, तुळशीचे असेही आहेत फायदे, जाणून घ्या, अधिक माहिती..