आजचं हवामान: ऑक्टोबर हिटसोबत दक्षिणेकडून येतंय नवीन संकट! 72 तास महत्त्वाचे, हवामान विभागाने दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रात मान्सून परतीची शक्यता, अरबी समुद्रातील चक्रीवादळ दबाव कमी. दक्षिणेकडील कमी दाबाचा पट्टा, हवामानात बदल, डिसेंबर ते फेब्रुवारी थंडी वाढणार.
मुंबई: महाराष्ट्रातून पुढच्या दोन ते तीन दिवसांत मान्सून परतीची शक्यता आहे. महाराष्ट्रात मागच्या 24 तासात विशेष पावसाची नोंद करण्यात आलेली नाही. अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळाचा दबाव कमी झाला आहे. चक्रीवादळ भारतापासून बरेच लांब गेले आहे. असं असलं तरीसुद्धा अवकाळी पावसाचं संकट कायम आहे.
दक्षिणेकडून येतंय संकट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडून एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे त्याची टर्फ लाईन ही महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांपर्यंत येत आहे. त्यामुळे हवामानात पुढचे 48 तासात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा वाढला तर अवकाळी पावसाचं संकट येण्याची शक्यता आहे.
प. बंगालच्या खाडीतही सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका
दुसरं महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालच्या खाडीतून वरच्या बाजूला सेवन सिस्टरच्या दिशेनं दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. त्यामुळे तिकडून येणारे वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे यामुळे हवामान सतत बदलत आहे. कधी दमट तर कधी हलक्या पावसाच्या सरी आणि त्यानंतर वाढणारा उकाडा यामुळे हैराण व्हायला झालं आहे. दुसरं म्हणजे ला निनामुळे यंदा थंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी कडाक्याची थंडी राहण्याची शक्यता आहे.
advertisement
विकेण्डला महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा
10 ऑक्टोबरपर्यंत पाऊस जाणार ऊन उन्हाचा तडाखा वाढणार आहे. मे महिन्यासारखी स्थिती ऑक्टोबरमध्येच पाहायला मिळू शकते. विकेण्डला ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 9 ऑक्टोबर रोजी कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात फारसा पाऊस राहणार नाही.
पुढचे 72 तास महत्त्वाचे, कोकणात मुसळधार
तळ कोकणात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस राहील. यावेळी 40-50 किमी ताशी वेगाने वारे वाहतील. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्य़ामुळे मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 10 ते 12 ऑक्टोबर रोजी दक्षिणेकडे मुसळधार पाऊस राहणार आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाचा कोणताही अलर्ट असणार नाही. दमट हवामान काही ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात कोणताही पावसाचा अलर्ट नसेल. दक्षिणेकडे हवामानात वेगाने बदल झाले तर महाराष्ट्रात देखील पावसाचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र ते येत्या 72 तासात पाहावं लागेल असं हवामान विभागाने सांगितलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 7:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: ऑक्टोबर हिटसोबत दक्षिणेकडून येतंय नवीन संकट! 72 तास महत्त्वाचे, हवामान विभागाने दिला अलर्ट