रोहित शर्माला सोडून गंभीरच्या बंगल्यावर 'डिनर डिप्लोमसी', BCCI चे अधिकारी उपस्थित, काय खलबतं झाली?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir Dinner Party : गौतम गंभीरने त्याच्या दिल्लीच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील उपस्थित होते.
Indian Cricket Team Dinner Party : आशिया कप जिंकल्यानंतर आता टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये जोश पहायला मिळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देखील वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यात पराभूत केल्यानंतर टीम इंडिया दिल्लीत पोहोचली आहे. दिल्ली कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंना गौतम गंभीरने पार्टी दिली. त्यावेळी सर्व कसोटी खेळणारे सर्व खेळाडू गंभीरच्या घरी टीम इंडियाच्या बसमधून पोहोचले होते.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित
गौतम गंभीरने त्याच्या दिल्लीच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील उपस्थित होते. भारतीय खेळाडू बसने गौतम गंभीरच्या निवासस्थानी पोहोचले. सर्व खेळाडू कॅज्युअल कपडे घातले होते. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली न दिल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
Team India arrived for Dinner at the house of @GautamGambhir @BCCI pic.twitter.com/COQ6EZ8WIJ
— vipul kashyap (@kashyapvipul) October 8, 2025
advertisement
हर्षित राणाला स्पेशल ट्रिटमेंट
केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी पांढरा टी-शर्ट घातला होता. कर्णधार शुभमन गिलने राखाडी टी-शर्ट आणि रात्रीच्या वेळी सनग्लासेस घातले होते. यावेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे देखील उपस्थित होते. तर हर्षित राणाला यावेळी स्पेशल ट्रिटमेंट मिळाली. हर्षित राणा बसने नाही तर खासगी कारने गौतमच्या घरी आला. या पार्टीमध्ये क्रिकेटबाबत काय खलबंत झाली? याची माहिती अद्याप समोर आली नाही.
advertisement
डिनरला काय काय?
दरम्यान समोर आलेल्या वृत्तानुसार, पार्टीत विविध प्रकारचे पदार्थ आणि मिठाई देण्यात आल्या. सुरुवातीपासून ते मुख्य पदार्थांपर्यंत, मेनूमध्ये भारतीय तंदूर पदार्थ, चियनिज आणि कॉन्टिनेंटल इटालियन पाककृतींचा समावेश होता. मात्र, टीम इंडियाचे खेळाडू टीम इंडियाच्या बसमधून गंभीरच्या घरी आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
दिल्ली टेस्टसाठी टीम इंडियाचा स्कॉड -
advertisement
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुरमा रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह
Location :
Delhi
First Published :
October 09, 2025 7:30 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित शर्माला सोडून गंभीरच्या बंगल्यावर 'डिनर डिप्लोमसी', BCCI चे अधिकारी उपस्थित, काय खलबतं झाली?