Anna Hazare : 'दु:ख वाटतं जेव्हा..'; अण्णा हजारेंनी केजरीवालांना सुनावले खडेबोल, ईडीच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली आहे, केजरीवाल यांच्याविरोधात झालेल्या कारवाईवर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

News18
News18
अहमदनगर प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना ईडीनं अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे पडसात संपूर्ण देशभरात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहेत. महारष्ट्रात देखील 'आप'च्या कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ईडी कारवाईवरून त्यांनी अरविंद केजरीवाल यांना खडेबोल सुनावले आहेत.
नेमकं काय म्हणाले हजारे?
अरविंद केजरीवाल यांच्या सारखा माणूस जो माझ्यासोबत काम करत होता. आम्ही दारूविरोधात आंदोलन केलं होतं, आणि आज त्यांनीच दारू धोरण बनवलं, याचं मला दु:ख वाटलं. पण काहीच करू शकत नाही, सत्तेपुढे कोणाचं काही चालत नाही. आता त्यांना ईडीने अटक केली आहे. आता जे होईल ते सरकारच्या धोरणानुसार होईल. सरकार त्यांच्याबाबत विचार करेल असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
advertisement
advertisement
शरद पवार यांची प्रतिक्रिया 
दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नाही. केजरीवाल यांच्या अटकेचा मी तीव्र निषेध करतो. जनतेनं सामूहिक शक्ति दाखवून द्यावी. आणीबाणीत जे झालं नव्हतं ते आता होत आहे. धोरण ठरवलं म्हणून अटक करणं चुकीचं. आम्ही केजरीवाल यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल चिंता वाटते. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Anna Hazare : 'दु:ख वाटतं जेव्हा..'; अण्णा हजारेंनी केजरीवालांना सुनावले खडेबोल, ईडीच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement