Lok Sabha Election : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार? शिंदेंनी सांगूनच टाकलं, म्हणाले..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Lok Sabha Election : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असून लवकरच उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
अहमदनगर, (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यात युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. यावर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, महायुतीचे जागावाटप ही लवकरच जाहीर होईल. महायुतीचे जे उमेदवार आहेत, ते लवकर जाहीर होणार आहे. दरम्यान उमेदवार हे जाहीर होण्यापूर्वीच महायुतीच्या कार्यकर्ते यांच्याकडून निवडणुकांच्या कामाला सुरुवात केली जाईल, असा विश्वास यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
नगर शहरातील माऊली सभागृह येथे शिवसेनेचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुजय विखे, मंत्री दादा भुसे, यांच्यासह नगर शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय गणितांची आखणी देखील यावेळी करण्यात आली.
मेळवा पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांना महायुतीच्या जागा वाटपाबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, महायुतीच्या जागावाटप हे दोन दिवसात पार पडेल तसेच उमेदवार देखील जाहीर होतील. मात्र, त्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या कामांना सुरुवात देखील करण्यात आली आहे.
advertisement
शिर्डी लोकसभेची जागा ही शिवसेनेकडे असून शिंदे गटाच्या विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे या ठिकाणाहून इच्छुक आहेत. मात्र, नवे राजकीय समीकरणांनुसार मनसेचे इंजिन हे महायुतीला जोडले गेले असल्याने या जागेवरून मनसे देखील दावा करू लागले आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, कोण कोणत्या जागेवरून लढणार यासाठी तुम्हाला दोन दिवसांची वाट पहावी लागणार आहे. कारण येत्या दोन दिवसात महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय हा जाहीर होईल. शिर्डीमध्ये आजच्या स्थितीला आमची विद्यमान खासदार लोखंडे हे आहेत व येणाऱ्या काळातही शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनाच लढा असा विश्वास देखील यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.
advertisement
जनतेने माझी कामे पाहिली आहेत जनता योग्य उमेदवाराला निवडून देईल : खासदार श्रीकांत शिंदे
view commentsउद्धव ठाकरे गटातून आनंद दिघे यांचे पुतण्यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले कुणी कुठे उभं राहावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. कल्याण मधून कोण उभ राहणार हे पक्ष ठरवेल. मी गेली पाच वर्ष त्या मतदारसंघांमध्ये काम करत आहे. जनतेने माझं काम पाहिलं आहे, त्याच जोरावर मोठ्या मताधिक्याने मी निवडून येईल. जनता निवडून देईल असा मला विश्वास आहे असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
March 23, 2024 4:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Lok Sabha Election : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार? शिंदेंनी सांगूनच टाकलं, म्हणाले..


