'ज्याला पालकमंत्रीपद घ्यायचंय, त्याने घ्या', बीडमध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ajit Pawar in Beed: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी बीडचं पालकमंत्रीपद सोडण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. सकाळपासूनच अजित पवारांनी विकासकामांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणी जात लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. दरम्यान, स्थानिकांच्या तक्रारी ऐकून अजित पवार यांचा पारा चढला. यानंतर अजित पवारांनी थेट पालकमंत्रीपद सोडण्याची भाषा केली. तसेच मी बीड दौऱ्यावरून रिटर्न जातो, असंही ते म्हणाले.
नेमकं काय घडलं?
अजित पवार हे काल रात्री बीडमध्ये मुक्कामी होते. यानंतर आज पहाटे पावणेसहा वाजता त्यांनी चंपावती क्रीडा मंडळाचा आढावा घेतला. त्यानंतर कंकालेश्वर मंदिराच्या विकासाच्या आराखड्याचा आढावा घेऊन ते थेट जिल्हा क्रीडा संकुलावर पोहोचले. या परिसरात असलेल्या कचरा पाहून दादांनी सर्वात आधी हा कचरा तिथून हटवत. तेथे पार्किंग करण्याच्या सूचना केल्या.
advertisement
यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले काही खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांनी अजित पवारांकडे विविध सूचना आणि समस्या मांडल्या. यावेळी अजित पवार यांनी याआधी तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं, त्यांनी काहीच केलं नाही. आता मला कोणाचे काही काढायचे नाही. परंतु मी करायला लागलो, तर मलाच ढुसण्या मारायला लागले. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही. तुम्ही सहकार्य करा. मी पण सहकार्य करतो. नाहीतर मी परत जातो. मग कुणाला पालकमंत्री करायचं असेल, त्यांना पालकमंत्री करा, अशा भाषेत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.
advertisement
अजित पवार यांनी विकासाच्या प्रश्नांवर उतावीळी झालेल्या बीडकरांबाबत नाराजी देखील व्यक्त केली. अजित पवार यांनी सहा वाजल्यापासूनच दौऱ्याला सुरुवात केल्याने प्रशासकीय अधिकारी कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडालेली होती. अलीकडेच अजित पवार यांनी पुणे दौरा केला होता. त्यावेळी देखील त्यांनी विकासकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या लोकप्रतिनिधींना, कंत्राटदारांना आणि अतिक्रमण करणाऱ्यांना झापलं होतं. आता बीडमध्ये देखील असाच प्रकार पाहायला मिळाला.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
August 07, 2025 8:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'ज्याला पालकमंत्रीपद घ्यायचंय, त्याने घ्या', बीडमध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय घडलं?