Ravi Rana : 'आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये' आमदार रवी राणा यांचं धक्कादायक विधान
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ravi Rana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
अमरावती, (संजय शेंडे, प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय ठरताना दिसत आहे. महिलांचा या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज मान्य करण्यात आले आहे. एकीकडे सत्ताधारी लोकांकडून या योजनेच्या प्रचारावर लाखो रुपये खर्च केले जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. अशात अपक्ष आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेवरुन वादग्रस्त विधान केलं आहे.
तर पैसे परत घेतले जाणार : रवी राणा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रमानपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे 3 हजार करू तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. जे मला आशीर्वाद देणार नाही, मी तुमचा भाऊ असून 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. तर सरकार देत राहते. पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं मत रवी राणा यांनी मांडले.
advertisement
लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार?
view commentsमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचं सांगितलं. तसेच, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रच खात्यात जमा होणार आहे, असंदेखील सांगितलं. पण, आज अजित पवारांनी (Ajit Pawar) मालेगावात बोलताना लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीजेला महिलांच्या खात्यात जमा होतील, असं म्हटलं. अजित पवारांच्या वक्तव्यानं काही काळासाठी संभ्रम निर्माण झाला. पण, काही क्षणातच अजित पवारांना जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
August 12, 2024 4:21 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
Ravi Rana : 'आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये' आमदार रवी राणा यांचं धक्कादायक विधान


