थारा पैसा, थारी गाडी, थारा बंगला, हे सारं आलं कुठून? खोक्याचा नंगानाच सुरूच, पैशात लोळतानाचा नवा VIDEO

Last Updated:

Who Is Khokya Satish Bhosle Beed: कधी शिकारी, कधी जनसामान्यांना त्रास देण्याचे धंदे तर कधी पैशाच्या राशी आणि त्याच पैशांची अंगावर उधळण... खोक्याचा कुबेरी रुबाब पाहून सारा महाराष्ट्र अचंबित झालाय.

सुरेश भोसले
सुरेश भोसले
बीड : बीडच्या वााल्मिक कराड आणि त्याच्या गँगची क्रूरतेची कहाणी संपते ना संपते तोच आता शिरूरच्या खोक्या नावाचा नवा गावगुंड चर्चेत आला आहे. कधी शिकारी, कधी जनसामान्यांना त्रास देण्याचे धंदे तर कधी पैशाच्या राशी आणि त्याच पैशांची अंगावर उधळण... खोक्याचा कुबेरी रुबाब पाहून सारा महाराष्ट्र अचंबित झालाय. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता. भाजपच्या भटक्या विमुक्त सेलचा तालुक्याचा अध्यक्ष. त्याची संपत्ती पाहून अनेकांना तोंडात बोटे घातली आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्याचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत असून ज्यात पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांची बंडले समोरच्या टेबलावर ठेवली आहेत. त्या बंडलांमधील नोटा त्याच्या अंगावर उधळल्या जात आहेत. त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याकडे एवढे पैसे आले कुठून असा सवाल उपस्थित केला जात आहे.

खोक्याला संपत्ती दर्शन करण्याची खुमखुमी, पोलीस त्याची मस्ती जिरवणार का?

advertisement
पैशात लोळतानाच खोक्या पाहून तो नेमका काय करतो, त्याचा व्यवसाय कोणता, त्याच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असे सवाल बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय. बरं या चित्रफितीला थारा पैसा, थारी गाडी, थारा बंगला... असे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गीत लावून आपल्या संपत्तीचे दर्शन करण्याचा खोक्याचा उद्देश स्पष्ट दिसतो आहे. त्यामुळे त्याच्या लक्ष्मी दर्शनाच्या स्त्रोताची पोलीस चौकशी करणार आहेत का, असेही प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत.
advertisement

खोक्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी

सतीश भोसले उर्फ खोक्या हा शिरूरमध्ये व्याजाने पैसे देतो, असे सांगितले जाते. व्याजाच्या पैशातून जमवलेल्या अवैध मायेचे दर्शन तो नवनव्या चित्रफिती बनवून लोकांना देत असतो. तसेच हरीण आणि इतरही वन्यजीवांच्या शिकारीचा त्याला भारी नाद आहे. त्याने आतापर्यंत शेकडो वन्यजीव मारले असल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगतात. बरं फक्त वन्यजीव मारून तो शांत बसला नाही तर त्याने अनेक माणसांनाही आतापर्यंत मारहाण केली आहे. पण सुरेश धस यांचा १०० टक्के आशीर्वाद असल्याने पोलीस त्याला हात लावत नाही.
advertisement
भलेही एक दोन गुन्हे मीच त्याच्यावर दाखल करायला सांगितले, असे सुरेश धस सांगत असले तरी खोक्याच्या वाढदिवशी त्या न विसरता दिलेल्या शुभेच्छा आणि समाजमाध्यमांवर फिरलेली ध्वनीफित यामुळे पोलिसही खोक्याला दचकून असतात. अशी खोक्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
थारा पैसा, थारी गाडी, थारा बंगला, हे सारं आलं कुठून? खोक्याचा नंगानाच सुरूच, पैशात लोळतानाचा नवा VIDEO
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement