दोन दादांमध्ये तीव्र स्पर्धा, एका दादांची आशा मावळली, पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा विषय क्लिअर!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या अजित पवारांनी पालकमंत्री असताना घ्याव्या लागणाऱ्या सगळ्या बैठकींसाठी अधिकारी बोलवून घेतले.
वैभव सोनवणे प्रतिनिधी, पुणे : राज्यात सरकार स्थापन झालं, मंत्रिमंडळ खातेवाटप सगळं झालं, आता शिल्लक आहे ती फक्त पालकमंत्रिपदाची वाटणी... राज्यात हा न्याय असला तरी पुण्यात मात्र अजितदादांचा पालकमंत्री मोड ऑनच आहे . उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या अजित पवारांनी पालकमंत्री असताना घ्याव्या लागणाऱ्या सगळ्या बैठकींसाठी अधिकारी बोलवून घेतले. तोच थाट तोच आदेश . आता पालकमंत्री म्हणून अधिकृत शिक्का बाकी आहे फक्त.. पण अजित पवारांना त्याने काही फरक पडत नाही .
पुण्यात वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका , पोलिस असे सगळे अधिकारी अजित पवारांकडे बैठकीला हजर होते . पालकमंत्री असताना घेतल्या जाणाऱ्या बैठकींची जंत्रीच अधिकाऱ्यांना सुचवून तातडीने काम उरकण्याच्या सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्यात . पालकमंत्रिपदाची वाटणी महायुतीत बाकी असतानाही अजित पवारांनी लावलेला धडाका वादाला कारणीभूत ठरेल असं वाटत असताना फडणवीसांनीही अजित पवारांची पाठराखण केलीय .
advertisement
अजित पवारांनी बारामतीच्या उपजिल्हा रुग्णालयात लावायच्या टाईल्ससाठी सुध्दा सर्किट हाऊसला सॅपंलचे प्रदर्शन लावण्याच्या सूचना दिल्या होत्या .. हे ही कमी म्हणून की काय तुळापूरला संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाचं काम हळू करण्याऱ्या ठेकेदाराला जाहीर झापलं . अजित पवार स्टाईलने हा सगळा कार्यक्रम सुरू आहे . खुद्द अजित पवारांना विचारल्यावर ते स्पष्ट म्हणतात आपलं हे असंच असतं.
advertisement
अजित पवारांचा पालकमंत्री मोड ॲान झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्या आशा जवळपास मावळल्यात जमा आहेत . पण अजित दादांच्या या शो ने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळालय .. कारण घोषणेआधीच दादा पालकमंत्री झालेत ..
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे राहावे, अशी आग्रही भूमिका चंद्रकांत पाटील यांची असल्याचे समजते. अजित पवार हे युतीत सहभागी होण्याआधी पुण्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडेच होते. आताही पुण्याचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले. परंतु तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुण्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे अर्थात अजित पवार यांच्याकडे जाईल, असे ठरल्याची माहिती मिळत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 24, 2024 3:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन दादांमध्ये तीव्र स्पर्धा, एका दादांची आशा मावळली, पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा विषय क्लिअर!