'आई! पाणी नको भीती वाटते, मला वाचव' 3 वर्षांच्या चिमुकल्याने व्हिवळत आईच्या मांडीवर सोडला जीव

Last Updated:

आईच्या कुशीत खेळणारा, बागडणारा, हसणारा आज तो नाही, या विचारानेच मन गलबलायला झालं. डोळ्यात अश्रू आणि स्वत: ला आई वडील दोष देत राहीले.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: आई....आई... आई... मला वाचवं गं, मला वाचवं.... चिमुकला यातनेनं व्हिवळत राहिला. छत्रपती संभाजीनगरच्या जाफर गेट मोंढा परिसरात काळीज पिळवटून टाकणारी मोठी दुर्घटना घडली आहे. फक्त तीन वर्षांचा निरागस चिमुकला, आईच्या कुशीत खेळणारा, बागडणारा, हसणारा आज तो नाही, या विचारानेच मन गलबलायला झालं. डोळ्यात अश्रू आणि स्वत: ला आई वडील दोष देत राहीले.
कुत्र्‍याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा जीव गेला
मोकाट कुत्र्याच्या चाव्याने त्याचं आयुष्य संपल आणि मागे राहिलं फक्त आईचा आक्रोश आणि एक शांतता. आई, मला पाणी नको… भीती वाटते… त्या चिमुकल्यांचे शेवटचे शब्द होते. चिमुकल्याच्या मृत्यूनं संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मोकाट कुत्र्याच्या चाव्याने एका निष्पाप तीन वर्षांच्या चिमुकल्याचे आयुष्य हिरावले गेले असून, या घटनेनंतर आईचा आक्रोश आणि कुटुंबावर कोसळलेले दुःखाचे डोंगर पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले.
advertisement
अरमान शेख नावाचा हा तीन वर्षांचा चिमुकला आठ दिवसांपूर्वी घराजवळ खेळत होता. त्याच वेळी एका मोकाट कुत्र्याने त्याला चावा घेतला. मात्र, त्यानंतर अरमानच्या शरीरावर कुठेही गंभीर जखम झाली नसल्याचे पाहून घरच्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि "सगळं ठीक होईल" असे गृहीत धरले. पण, नियतीने काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते.
आई मला वाचव चिमुकला कळवळला
काही दिवसांनी मुलाला ताप येऊ लागला, त्यानंतर डोक्यात एक छोटी जखम असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. मात्र, त्यानंतर मुलामध्ये एक गंभीर लक्षण दिसू लागले. तो पाणी पाहून थरथर कापू लागला. आईने त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो भीतीने मागे सरकला आणि रडत रडत म्हणाला, "आई, पाणी नको… मला वाचव… आई मला वाचव ना…"
advertisement
मुलाचे हे शब्द ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने त्याला मिठी मारली, त्याच्या अंगावरून हात फिरवत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. पण, रेबीजच्या संसर्गामुळे त्या लहानशा जीवाचा श्वास हळूहळू कमी होत गेला.
जखम लपवल्याने घडला प्रकार
अरमानचे काका, शेख रहीस यांनी सांगितले की, "कुत्र्याने हल्ला केल्याबद्दल आम्हाला कोणीही सांगितलं नाही. खेळताना पडल्यामुळे लागलं असं अरमाननं सांगितलं होतं." घटनेच्या आठ दिवसानंतर अरमान जेव्हा आपले डोके खाजवू लागला, तेव्हा कुटुंबीयांना केसांखाली लपलेले कुत्र्याच्या दातांचे व्रण दिसले. व्रण दिसताच कुटुंबीयांनी अरमानला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, एका रुग्णालयाने उपचार नाकारून त्याला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले.
advertisement
रुग्णालयाकडून उपचारासाठी नकार
दुर्दैवाने, पुढील दोन रुग्णालयांनीही या चिमुकल्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि मुलाचे वाचणे कठीण आहे, असे कुटुंबीयांना सांगितले. अरमानच्या शेवटच्या क्षणी"त्याला पाणी पाहण्याचीही भीती वाटत होती. तो सतत आपले शरीर खाजवत होता आणि घाबरून ब्लँकेटखाली लपत होता. मोकाट कुत्र्यांप्रमाणेच अरमानच्या तोंडून पाणी गळू लागले होते." यानंतर, डॉक्टरांनी कुटुंबीयांना रेबीज प्रतिबंधक लस घेण्याचा सल्ला दिला.
advertisement
या दुर्घटनेमुळे अरमानचे कुटुंब पूर्णपणे हादरले आहे. अशा प्रकारचे दुःख इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांनी प्रशासनाकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आणि अशा घटना थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आई! पाणी नको भीती वाटते, मला वाचव' 3 वर्षांच्या चिमुकल्याने व्हिवळत आईच्या मांडीवर सोडला जीव
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement