Private jet accident: विमान उड्डाण करताना भीषण अपघात, घटनास्थळावरचा पहिला VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Private jet accident: या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, विमानातील सर्व लोक सुरक्षित आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
विमान उड्डाण करत असताना अचानक कंट्रोल सुटला आणि रनवेवरुन घसरुन झुडुपात गेलं. पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना समोर आली आहे. भीषण विमान अपघात झाला आहे. या अपघातानंतरचा एक व्हिडीओ समोर आला. उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. एका खासगी विमानाचा अपघात झाला, सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी आणि दोन्ही पायलट बालंबाल बचावले आहेत.
उड्डाण करताना रनवे सोडून बाहेर गेलं
मिळालेल्या माहितीनुसार, हा खासगी जेट विमान धावपट्टीवरून उड्डाण भरत असताना अचानक अनियंत्रित झाले आणि त्याचा अपघात झाला. विमान धावपट्टीवर कोसळल्यामुळे या घटनेने परिसरात मोठा थरार निर्माण झाला होता. अपघात नेमका कशामुळे झाला, विमानाचा ताबा नेमका कोणत्या कारणामुळे सुटला, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
advertisement
विमान अपघातानंतरचा व्हिडीओ
प्राइवेट जेट ने रनवे पर खोया कंट्रोल, झाड़ियों में घुसा #Farrukhabad #UP@amitviews pic.twitter.com/GvYKK7yDpL
— News18 India (@News18India) October 9, 2025
कारण अस्पष्ट चौकशी सुरू
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, विमानातील सर्व लोक सुरक्षित आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून, विमान कंपन्या आणि नागरी उड्डाण प्राधिकरणाचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत.
Location :
Uttar Pradesh
First Published :
October 09, 2025 2:11 PM IST