शेतकरी महिलेचा शॉक लागून मृत्यू, 10 तासानंतरही... महावितरणच्या अधिकाऱ्यांची माणुसकीही मेली?
- Published by:Shreyas
Last Updated:
हिंगोलीच्या साखरा येथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे.
मनिष खरात, प्रतिनिधी
हिंगोली, 4 ऑगस्ट : हिंगोलीच्या साखरा येथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे शेतात पडलेल्या विद्युत खांबाचा विद्युत पुरवठा खंडित न केल्याने या महिलेचा विद्युत तारेला स्पर्श झाला, ज्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नंदाबाई मोगरे असं या महिलेचे नाव आहे.
आज सकाळी शेतात जात असताना खाली पडलेल्या विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान ही दुर्घटना घडून दहा तास उलटले तरी महावितरणचा किंवा प्रशासनाचा कोणीही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. रात्रीचे नऊ वाजले तरी नातेवाईकांनी ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करूनही घटनास्थळी कोणी आलं नाही. प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेमुळे ग्रामस्थ चांगले संतापले होते. महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, पण रात्री 9 वाजेपर्यंत मृतदेह त्याच स्थितीमध्ये होता. 11 तास उलटल्यानंतर आणि महावितरणला कळवल्यानंतरही कोणताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नाही, यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
Aug 04, 2023 11:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकरी महिलेचा शॉक लागून मृत्यू, 10 तासानंतरही... महावितरणच्या अधिकाऱ्यांची माणुसकीही मेली?











