लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट! आता रेशन कार्डवर मिळणार साडी, काय आहे योजना?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Saree on Ration Card: रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
कोल्हापूर: ‘लाडक्या बहिणीं’ना सरकार पुन्हा एक गिफ्ट देणार आहे. शासनाकडून आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एक साडी भेट दिली जाते. यंदाही लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप केले जाणार असून सर्व जिल्ह्यांना साडीचे वितरण सुरू झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 51 हजार 810 शिधापत्रिकांवर ही साडी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गोदामात साड्या दाखल झाल्या असून पुढील महिन्यात सर्व तालुक्यांत साड्या पोहोचल्यानतंर वाटप सुरू होणार आहे.
कधी होईल साड्यांचे वाटप ?
रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. कोल्हापुरात सध्या तरी फक्त एका तालुक्यातील गोडावूनला साड्या दाखल झाल्या आहेत. अन्य तालुक्यांमध्ये साड्या पोहोचल्या की त्यांचे वितरण सुरू होईल. साधारण मार्च महिन्याच्या पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरण सुरू होईल. या साड्या फक्त अंत्योदय शिधापत्रिकांवर दिल्या जाणार आहेत. एका कार्डावर एक साडी याप्रमाणे 51 हजार 810 साड्यांचे वाटप केले जाणार असून त्यासाठी होळीपर्यंतचा कालावधी दिला आहे.
advertisement
कोणत्या तालुक्यात किती महिलांना लाभ?
गगनबावडा 803, करवीर – 1316, भुदरगड – 2762, शाहूवाडी – 2806, कोल्हापूर – 3046, पन्हाळा – 3455, आजरा – 3706, कागल – 3942, राधानगरी – 4157, शिरोळ – 4475, इचलकरंजी शहर – 4879, हातकणंगले – 4886, गडहिंग्लज – 5546, चंदगड - 6009
advertisement
साड्यांचा दर्जा कसा असेल?
सरकारने लाडक्या बहिणींना भेट म्हणून साड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्या साड्यांच्या दर्जा कसा असेल? याबाबत चर्चा होतेय. महिलांना त्यांच्या आवडत्या रंगाच्या आणि चांगल्या दर्जाच्या साड्या मिळतील की सरसकट एकाच प्रकारच्या साड्या मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
February 22, 2025 9:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट! आता रेशन कार्डवर मिळणार साडी, काय आहे योजना?