कोल्हापुरात गणेशोत्सवापूर्वीच पेटला वाद! 'आम्ही पंचगंगेतच मूर्तीचं विसर्जन करणार', हिंदूत्ववादी आक्रमक!

Last Updated:

महापालिका वर्षभर विविध मार्गांनी होणाऱ्या प्रदुषणाकडे दुर्लक्ष करते आणि गणेशोत्सवातच जागे होते. नाले, साखर कारखाने यांसारख्या विविध मार्गांनी प्रदुषण होत राहते. त्यावेळी...

प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो
कोल्हापूर : 'गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन हा हिंदूंचा धार्मिक अधिकार आहे. त्यामुळे आम्ही पंचगंगा नदीतच विसर्जन करणार', अशी ठाम भूमिका हिंदू जनजागृती समितीने घेतली आहे. गणेश विसर्जनच्या मुद्द्यावर कोल्हापूर महानगरपालिकेत एक बैठक पार पडली. त्यात नदी प्रदुषण उपाययोजनेवर हिंदूत्त्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि पंचगंगा नदीवर गणेशमूर्तीचं विसर्जन करण्याच्या मागणीवर ठाम राहिले.
प्रशासनाने न्यायालयाचा 'हा' आदेश दाखवावा
कोल्हापूर महानगरपालिकेत उपायुक्त शिल्पा दरेकर आणि प्रदुषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनावर अनेक आरोप केले. नदी प्रदुषणामुळे शासन आणि प्रशासन न्यायालयाचे आदेश पुढे करते पण भाविकांना गणेशमूर्ती पंचगंगेत विसर्जन करू नये यासाठी पंचगंगा नदीवर लोखंडी कठडे लावावेत, असा आदेश असल्याचं कुठेही दाखवलं जात नाही, असे मत हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी मांडले.
advertisement
वर्षभर होणाऱ्या प्रदुषणाकडे पालिकेचे दुर्लक्ष का?
महापालिका वर्षभर विविध मार्गांनी होणाऱ्या प्रदुषणाकडे दुर्लक्ष करते आणि गणेशोत्सवातच जागे होते. नाले, साखर कारखाने यांसारख्या विविध मार्गांनी प्रदुषण होत राहते. त्यावेळी महापालिका प्रशासन, प्रदुषण मंडळं आणि पुरोगामी कुठे असतात, पंचगंगा नदीत विविध मार्गांनी प्रदुषित झालेला पाणी नाल्यांच्या मार्गाने जात असते, त्यावेळी प्रशासन काय करते असा सवालही हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी बैठकीत उपस्थित केला. यावेळी पालिकेचे अधिकारी काहीही बोलू शकले नाहीत. यावेळी महापालिकेत शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांची भेट घेतली. ते म्हणाले की, "यंदाही गणेशभक्त, भाविक पंचगंगेतच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतील", असे आश्वासन सर्वांना दिले.
advertisement
मराठी बातम्या/कोल्हापूर/
कोल्हापुरात गणेशोत्सवापूर्वीच पेटला वाद! 'आम्ही पंचगंगेतच मूर्तीचं विसर्जन करणार', हिंदूत्ववादी आक्रमक!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement