Video : 10 जणांना उडवलं आणि एकाचा मृत्यू, बेधुंद JCB चालकाचा थरार कॅमेरात कैद
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हा प्रकार लातूर जिल्ह्यातील आहे. शहरातील कन्हेरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्त्यावरील 10 ते12 जणांना उडवलंय. यात जालिंदर मुळे या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लातूर : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, हे व्हिडीओ कधी एखाद्या धक्कादायक क्षणांचे असतात, तर कधी मजेदार क्षणांचे, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे, जो जेसीबीशी संबंधीत आहे. खरंतर या जेसीबी चालकाने बेधुंद अवस्थेत गाडी चालवली.
हा प्रकार लातूर जिल्ह्यातील आहे. शहरातील कन्हेरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्त्यावरील 10 ते12 जणांना उडवलंय. यात जालिंदर मुळे या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जालिंदर हा भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेला होत, त्यादरम्यान या जेसीबी चालकानं त्याच्यावर जेसीबी चढवला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी जेसीबी चा पाठलाग करत जेसीबी चालकाला धरून पोलिसांच्या हवाली केलंय. दरम्यान त्याचा व्हिडीओ ही बनवला.
advertisement
Video : 10 जणांना उडवलं आणि एकाचा मृत्यू, बेधुंद JCB चालकाचा थरार कॅमेरात कैद pic.twitter.com/V2mLBOt42x
— News18Lokmat (@News18lokmat) August 13, 2024
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका जेसीबी चालकानं सर्वीस रोडकडे वळण घेतलं आणि तो सुसाट सुरु आहे. काही लोक त्याला थांबावण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही लोक पाठलाग करत आहेत. पण हा जेसीबी चालक थांबायला काही तयार नाही. दरम्यान व्हिडीओत ही तुम्ही पाहू शकता, जो समोर येईल त्याला उडवत हा जेसीबी चालक चालला आहे. पुढे जाऊन तो एका बाईक चालकाला टक्कर देतो, पण नशिबाने त्या बाईक चालकाला काही होत नाही आणि त्याचे प्राण वाचले. पुढे हा व्हिडीओ तिथेच संपला.
advertisement
पण असं सांगितलं जात आहे की पुढे जाऊन या जेसीबी चालकाला नागरिकांनी पकडले आणि पोलिसांच्या हवाली केलं.
या व्हिडीओत तुम्ही जेसीबी चालकाला सुसुट गाडी चालवताना पाहू शकता. या व्हिडीओनंतर पोलिसांनी जेसीबी चालकावर कारवाई केली आहे. पुढील तपास लवकरच सुरु होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 13, 2024 4:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video : 10 जणांना उडवलं आणि एकाचा मृत्यू, बेधुंद JCB चालकाचा थरार कॅमेरात कैद










