Latur : वृद्ध आई-वडिलांना सांभाळले नाही तर...; ग्रामपंचायतीने घेतला ऐतिहासिक निर्णय
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
वृद्ध मातापित्यांच्या भविष्याचा विचार करत गावातील कोणत्याही वृद्धाला वृद्धाश्रमात पाठवण्याची वेळ येऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनेच पावले उचलली.
नितिन बनसोडे, लातूर, 06 सप्टेंबर : वृद्ध आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीतून कोणतेही प्रमाणपत्र न देण्याचा आणि वृक्षरोपण केल्याशिवाय विवाह प्रमाणपत्र न देण्याचा ऐतिहासिक निर्णय लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव काळे ग्रामपंचायतीनं घेतला. " मुलापेक्षा मुलगी बरी , प्रकाश देते दोन्ही घरी " या म्हणीप्रमाणं असं म्हणतात कि मुलींचं सर्वात जास्त प्रेम हे आपल्या आईवडिलांवर असतं , पण सासरी गेल्यावर मुलींना आपल्या आईवडिलांचा सांभाळ करण्याची ईच्छा असूनही ती पूर्ण करू शकत नाही. मात्र लातूर जिल्ह्यातल्या एका महिला सरपंचानं गावात धडाकेबाज निर्णय घेत आपल्याच नाही तर तमाम ग्रामस्थांच्या वृद्ध आईवडिलांच्या संभाळाचा मसुदाच तयार केलाय.
लातूर तालुक्यातलं हे आहे बोरगाव काळे गाव , या गावात एका महिलेनं सरपंच पदाची धुरा हाती घेतली आणि या गावाचं नशीबच बदललं . या गावच्या महिला सरपंच अनिता काळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर करून घेण्याची किमया साधलीय.
advertisement
वृद्ध मातापित्यांच्या भविष्याचा विचार करत गावातील कोणत्याही वृद्धाला वृद्धाश्रमात पाठवण्याची वेळ येऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनेच पावले उचलली. वृद्ध आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्याना ग्रामपंचायतीतून कोणतीही सुविधा अथवा कोणतेही प्रमाणपत्र न देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय वृक्ष लागवड चळवळ उभी करून वृक्षाचं रोपण व्हावं यासाठी नवीन लग्न झालेल्या दांपत्याला वृक्ष लागवड केल्याशिवाय विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार नसल्याचा देखील निर्णय घेण्यात आलाय.
advertisement
ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत सर्व ग्रामस्थांनी केलंय , या निर्णयामुळं कोणताही वृद्ध निराधार राहणार नसल्यानं ग्रामस्थांना देखील या निर्णयाचं कौतुक वाटतंय असल्याचं सरपंच अनिता काळे यांनी म्हटलं. वृद्धांच्या भविष्याचं नियोजन आणि वृक्ष लागवड चळवळ उभं करणारी कदाचित मराठवाड्यातली हि पहिलीच ग्रामपंचायत असावी.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2023 3:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur : वृद्ध आई-वडिलांना सांभाळले नाही तर...; ग्रामपंचायतीने घेतला ऐतिहासिक निर्णय


