Latur News : पुण्यातील कोयता गँगचं लोण लातुरात! खाजगी ट्रव्हल्सवर टोळक्याचा हल्ला; परिसरात खळबळ

Last Updated:

Latur News : लातूर शहरात कोयता गँगने धुडगूस घालत खाजगी ट्रॅव्हल्सची तोडफोड केली. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

पुण्यातील कोयता गँगचं लोण लातुरात!
पुण्यातील कोयता गँगचं लोण लातुरात!
लातूर, (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) : पुण्यातील कोयता गँगचे लोण आता इतर जिल्ह्यातही पोहचत असल्याचे समोर येत आहे. काल (16 मार्च) इंदापूरमध्ये एका टोळक्याने तरुणाचा गोळी घालून खून करत कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना ताजी असतानाच लातूरमध्येही कोयता गँगने धुडघूस घातल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ऐन लोकसभा निवडणुकांच्या काळात कायद व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
लातूरमध्ये कोयता गँगचा धुडगूस
लातूर शहरात दहशत निर्माण करण्यासाठी नव्याने कोयता गँग सक्रिय झाली आहे. निलंगा येथील कोर्टाच्या आवारात कोयता घेऊन दहशत माजविन्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच लातूर शहरात देखील लातूर बार्शी रोडवर पुण्याला जाणाऱ्या खाजगी ट्रव्हल्सवर कोयता गँगने कोयत्यानं हल्ला करत खाजगी ट्रव्हल्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलय. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.
advertisement
पुण्यात काय घडलं?
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी जेवण करण्यासाठी बसलेल्या युवकावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याने आळंदी येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.अविनाश बाळू धनवे (वय 34 अंदाजे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
वाचा - दुसऱ्या वर्गातील शिक्षिकाही उपस्थित, सुरू होती सामूहिक कॉपी, तरुण लिहित होता...
शनिवारी (दि.16) सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास हा गोळीबाराचा प्रकार घडला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल जगदंबा या ठिकाणी मयत धनवे इतर काही सहकार्यांसोबत जेवण करण्यासाठी बसला होता. यावेळी चार चाकी मधून आलेल्या सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केला. यामध्ये धनवे नामक युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/लातूर/
Latur News : पुण्यातील कोयता गँगचं लोण लातुरात! खाजगी ट्रव्हल्सवर टोळक्याचा हल्ला; परिसरात खळबळ
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement