Maharashtra Elections 2024 : अखेर अजितदादांच्या विश्वासूला दुसऱ्या यादीत उमेदवारी, भाजपचा विरोध मावळला?

Last Updated:

NCP Ajit Pawar Candidates Second List : अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपली दुसरी यादी जाहीर केली. या यादीत अजित पवार यांचे विश्वासू असलेले सुनील टिंगरे यांना अखेर उमेदवारी मिळाली आहे.

NCP Ajit Pawar Announce second list of Candidate for Assembly Elections sunil tingre
NCP Ajit Pawar Announce second list of Candidate for Assembly Elections sunil tingre
पुणे :  अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपली दुसरी यादी जाहीर केली. या यादीत अजित पवार यांचे विश्वासू असलेले सुनील टिंगरे यांना अखेर उमेदवारी मिळाली आहे. सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार आहेत. आता, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केल्याचे वृत्त होते. अजितदादांच्या जवळचे असलेले सुनील टिंगरे यांना पहिल्या उमेदवारी यादीत स्थान नसल्याने चर्चांना उधाण आले होते. सुनील टिंगरे यांच्यावर पुण्यातील पोर्शे कार हिट अॅण्ड रन केसमधील आरोपीला मदत केल्याचा आरोप होता.
आज सकाळी मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काही नेत्यांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील, निशिकांत पाटील, काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी, नांदेडचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार देवेंद्र भुयार आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

सुनील टिंगरे यांनी काय म्हटले?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी म्हटले की, ही जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यामुळे शंका नव्हती पण सगळ्यांना जागा मागत असतात. महायुती प्रचार सर्वजण करतील. आदेश आला की सर्वजण काम करतील असे त्यांनी म्हटले. कल्याणी नगर अपघात प्रकरणाचा सर्व बाबी स्पष्ट झाल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement

पुण्यातील लक्षवेधी लढत

वडगाव-शेरीमध्ये आता पुण्यातील लक्षवेधी लढत होणार आहे. सुनिल टिंगरे विरुद्ध बापू पठारे अशी ही लढत होणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपच्या जगदीश मुळीकांची भूमिका गुलदस्त्यात आहे. बापू पठारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणुकीच्या मैदानात आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. वडगाव शेरीमध्ये बापू पठारे यांचे चांगलेच वर्चस्व आहे. त्यामुळे या ठिकाणी हायव्होलटेज लढत होणार आहे.
advertisement
मागील विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरे यांना 97,708 मते मिळाली होती. तर, भाजपच्या जगदीश मुळीक यांनी 92,752 मते मिळवली. 2014 च्या निवडणुकीत जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांचा 5,325 मतांनी पराभव केला.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दुसऱ्या यादीत कोणाला संधी

शिरुर - ज्ञानेश्वर कटके
तासगाव - संजयकाका पाटील
इस्लामपूर- निशिकांत पाटील
advertisement
अणुशक्तीनगर- सना मलिक
वांद्रे पूर्व- झिशान सिद्दिकी
वडगाव शेरी - सुनील टिंगरे
लोहा- प्रतापराव चिखलीकर

 इतर संबंधित बातमी :

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : अखेर अजितदादांच्या विश्वासूला दुसऱ्या यादीत उमेदवारी, भाजपचा विरोध मावळला?
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement