Shivsena UBT: इतक्या जागा जिंकूनही जे भाजप, शिंदेंना जमलं नाही ते मुंबईत ठाकरेंनी करून दाखवलं!

Last Updated:

Shiv Sena UBT Mumbai Winning Candidates List: फुटीनंतरच्या संख्येत ठाकरेंनी वाढ केली असली तरी त्यात मुंबईचा मोठा वाटा आहे. ठाकरेंना महायुतीच्या त्सुनामीत काही प्रमाणात तारलं.

Shiv Sena UBT Mumbai Winning Candidates list
Shiv Sena UBT Mumbai Winning Candidates list
मुंबई : राज्यात आलेल्या महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीची धूळधाण उडाली. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला. शिवसेनेतील फुटीनंतर 15 आमदारांनी ठाकरेंना साथ दिली होती. फुटीनंतरच्या संख्येत ठाकरेंनी वाढ केली असली तरी त्यात मुंबईचा मोठा वाटा आहे. ठाकरेंना महायुतीच्या त्सुनामीत काही प्रमाणात तारलं.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फूट पडली. त्यावेळी शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी मोठ्या प्रमाणावर शिंदे यांना साथ दिली. त्यानंतर शिवसेना हा पक्ष आणि अधिकृत निवडणूक चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडील गटाला देण्यात आले. तर, एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ दिली आणि महायुतीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिली निवडणूक असल्याने ठाकरेंसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. शिवसेना ठाकरे गटाने या विधानसभेच्या निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केली. शिवसेना ठाकरे गटाला 20 जागांवर यश मिळाले. या 20 जागांमध्ये मुंबईतून मोठ्या प्रमाणावरील जागांचा समावेश आहे. राज्यात धूळधाण होत असताना ठाकरेंनी मुंबईतील आपले स्थान कसेबसे टिकवून ठेवले.
advertisement

ठाकरे गटाचा मुंबईत कोणत्या जागांवर विजयी?

शिवसेनेचे मुंबई, ठाणे या पट्ट्यात चांगले काम आहे. शिवसेनेतील फूट पडल्यानंतर ठाकरेंसमोर मुंबईतील आपले स्थान टिकवण्याचे मोठे आव्हान होते. त्यात काही प्रमाणात ठाकरे यशस्वी झाल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाचा 20 जागांचा विजय झाला. त्यातील 10 जागा या मुंबईतील आहेत.

मुंबईत ठाकरेंचे विजयी उमेदवार आणि मतदारसंघ

advertisement
  • विक्रोळी - सुनिल राऊत
  •  जोगेश्वरी पूर्व - बाळा नर
  •  वर्सोवा - हारून खान
  •  वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई
  • माहीम - महेश सावंत
  •  वरळी - आदित्य ठाकरे
  • शिवडी - अजय चौधरी
  • भायखळा - मनोज जामसुतकर
  •  दिंडोशी - सुनिल प्रभू
  • कलिना - संजय पोतनीस
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivsena UBT: इतक्या जागा जिंकूनही जे भाजप, शिंदेंना जमलं नाही ते मुंबईत ठाकरेंनी करून दाखवलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement