अटक अटळ! मंत्री कोकाटेंना हायकोर्टाचा दणका, न्यायलय नेमकं काय म्हणाले?
- Published by:Prachi Amale
- Reported by:PRASHANT BAG
Last Updated:
१९ डिसेंबरला या प्रकरणी सुनावणी होणार असून तोपर्यंत, कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
मुंबई : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यानंतर कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बॉम्बे हायकोर्टाने कोकांटेंना मोठा दणका दिला असून तातडीच्यासुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळे आता कोकाटेंची अटक आता निश्चित आहे. १९ डिसेंबरला या प्रकरणी सुनावणी होणार असून तोपर्यंत, कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर एन लढ्ढा यांच्या एककलपीठासमोर सुनावणी झाली. नाशिक न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर कोकांटेनी मुंबई उच्च न्यायालयता धाव घेतली.
कोर्टात काय घडलं?
कोकाटेंचे वकील अनिकेत निकम - हे नवीन पुनरावलोकन आहे. सुनावणीपूर्वीच सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यांना त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी सांभाळावी लागणार आहे. त्यांना ४६७ आणि काही कलमांतून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
advertisement
न्यायाधीश आर.एन. लड्ढा - सोमवार
निकम - सुट्टी जवळ येत आहे. शुक्रवारी यावर सुनावणी होऊ शकते का?
शरद शिंदे पाटील यांच्या वतीने उपस्थित असलेले वकील अनुकुल सेठ सामाजिक कार्यकर्ते - त्यांना त्यांचा जामीनपत्र जमा करावा लागला आहे आणि त्यांनी स्वतःला लीलावतीत दाखल केले आहे.
न्यायालय - शुक्रवार. खूप लहान प्रकरण गुंतलेले आहे.
advertisement
कारवाईची दाट शक्यता
माणिकराव कोकाटे यांचे वकील अनिकेत निकम यांनी सुनावणी होईपर्यंत अटकेपासून संरक्षण मागितले नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाईची दाट शक्यता आहे. हायकोर्टाने अटकपासून संरक्षणाची मागणी न केल्याने तसा कोणताही दिलासा सध्या तरी कोर्टाकडून त्यांना देण्यात आलेला नाही.
कोकाटे यांच्या राजीनाम्यावर दोन्ही महायुती मित्र पक्ष आग्रही
advertisement
माणिकराव कोकाटे यांना हायकोर्ट कडून दिलासा न मिळाल्याने आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित मानला जात आहे. कोकाटे यांना अटक वाॅरंट निघाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच कोकाटे यांच्या राजीनाम्यावर दोन्ही महायुती मित्र पक्ष आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मणिकराव कोकाटेंची अटक निश्चित मानली जात असून सध्या कोकाटे आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 3:22 PM IST









