Manoj Jarange Mumbai: 'रोज पोलीस स्टेशनची पायरी चढा'; मनोज जरांगेच्या डोक्याला शॉट देण्यासाठी मुंबई पोलिसांची नवी खेळी
- Published by:Prachi Amale
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे,
मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या आझाद मैदानातील उपोषणाला मुंबई पोलीस पुढील काही दिवस परवानगी देणार आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देणार असले तरी त्यांच्यासमोर काही अटीशर्थी ठेवणार आहेत. मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
आझाद मैदानावर उपोषणासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमलेले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यामुळे परवानगीचा कालावधी मर्यादित रोज परवानगीसाठी मनोज जरांगेना अर्ज करावा लागणार आहे. रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतची परवानगी दिली जाणार आहे.
जरांगेंच उपोषणामुळे सरकारसमोर मोठे आव्हान
advertisement
मनोज जरांगे पाटील यांचे हे उपोषण राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरत असून, त्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन लाभत आहे. याआधीही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने पेटली होती. आता पुन्हा एकदा जरांगे यांच्या उपोषणामुळे सरकारसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
मराठा आंदोलनावर मुंंबई पोलिसांची नजर
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद मैदानासारख्या संवेदनशील ठिकाणी आंदोलन चालू असल्याने रोजच्या परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. गर्दीचे प्रमाण, कायदा सुव्यवस्थेची स्थिती आणि इतर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचे अहवाल तयार केले जात आहे. त्या आधारे पुढील दिवसाची परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. यासोबतच, उपोषणादरम्यान कोणतीही अनुशासनभंगाची घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने आयोजकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांच्या गैरसोयी टाळण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
दररोजच्या परवानगीच्या प्रक्रियेमुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र या निर्णयामुळे आंदोलनकर्त्यांची नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काही दिवसांत या आंदोलनाची दिशा आणि सरकारची भूमिका याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 5:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Mumbai: 'रोज पोलीस स्टेशनची पायरी चढा'; मनोज जरांगेच्या डोक्याला शॉट देण्यासाठी मुंबई पोलिसांची नवी खेळी


